VIDEO VIRAL: पाकिस्तानात हेलिकॉप्टरमधून केला नोटांचा वर्षाव

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 18 मार्च 2021

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील मंडी बहाउद्दीनमध्ये बंगालीशी झुंज देत या हेलिकॉप्टरने नोटांचा पाऊस पाडला आहे. खरं तर इथल्या एका विवाह सोहळ्यात हेलिकॉप्टरवरून एका लग्नाच्या सोहळ्यात फुलांचा आणि नोटांचा वर्षाव करण्यात आला होता.

इस्लामाबाद: (video viral money rain from Helicopter in Pakistan) पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील मंडी बहाउद्दीनमध्ये बंगालीशी झुंज देत या हेलिकॉप्टरने नोटांचा पाऊस पाडला आहे. खरं तर इथल्या एका विवाह सोहळ्यात हेलिकॉप्टरवरून एका लग्नाच्या सोहळ्यात फुलांचा आणि नोटांचा वर्षाव करण्यात आला होता. इतकेच नाही तर या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जिथे  नवरदेवाचा भाऊ परदेशात राहतो आणि तो आपल्या भावाच्या लग्नासाठी पाकिस्तानात आला आहे. त्याने लग्नात आलेल्या पाहूण्यांवर नोटांचा आणि फुलांचा वर्षाव करण्यासाठी खास हेलिकॉप्टर भाड्याने घेतले होते.

बायडन यांच्या वक्तव्यानंतर रशियाने रादूताला मायदेशी बोलवलं 

मिळालेल्या माहितीनुसार, ही पाकिस्तानमध्ये घडलेली अशी पहिली घटना नाही. यापूर्वी गुजरांवाला येथे एका उद्योगपतीने मुलाच्या लग्नात आलेल्या पाहूण्यांवर डॉलर चा पाऊस पाडला होता. काही काळानंतर त्याचा सुद्धा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये असे दिसते आहे की, हेलिकॉप्टरमधून मिरवणुकीवर नोटांचा वर्षाव करीत आहेत. वास्तविक, पाकिस्तानी नागरिक मोठ्या संख्येने जगातील विविध देशांमध्ये राहतात. अशा परिस्थितीत, आपल्या देशात परत येताना, ते लग्नांमध्ये प्रचंड खर्च करतात.(video viral money rain from Helicopter in Pakistan)

बायडन यांच्या वक्तव्यानंतर रशियाने राजदूताला मायदेशी बोलवलं 

पाकिस्तान कर्जाच्या जाळ्यात अडकला आहे 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान देशातील वाढती महागाई आणि बेरोजगारी रोखण्यात अपयशी ठरले आहे. मोठ्या प्रमाणावर परदेशातून कर्ज घेऊन इम्रान पाकच्या लोकांना कर्जाच्या सापळ्यात अडकवत जात आहे. काही दिवसांपूर्वी एका अहवालात असे सांगितले गेले होते की कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या पाकिस्तानमधील प्रत्येक नागरिकावर एक लाख 75 हजार रुपयाचे कर्ज आहे. यात इम्रान खानच्या सरकारने 54,901 रुपयांचे योगदान दिले आहे. बेरोजगारी आणि महागाईमुळे त्रस्त लोकांना मदत देण्यासाठी ठोस पावले   उचलण्यास इम्रान सरकार अपयशी ठरले आहे.(video viral money rain from Helicopter in Pakistan)

बांग्लादेशमधील हिफाजत-ए-इस्लाम संघटनेचा हिंदू गावावर हल्ला 

 

संबंधित बातम्या