शर्टलेस व्हिडिओ रेकॉर्ड करणं पडलं महागात, ग्रामस्थ संतापले

शर्ट न घालता पवित्र वृक्षावर चढणे आणि नंतर तिथून व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करणं, एका व्यक्तीला चांगलचं महागात पडलं आहे.
शर्टलेस व्हिडिओ रेकॉर्ड करणं पडलं महागात, ग्रामस्थ संतापले
ShirtlessDainik Gomantak

शर्ट न घालता पवित्र वृक्षावर चढणे आणि नंतर तिथून व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करणं, एका व्यक्तीला चांगलचं महागात पडलं आहे. 10 मीटर उंच असणाऱ्या पवित्र वृक्षावर चढताना पोलिसांनी त्याला पकडलं. त्यानंतर त्याला दंड भरावा लागला. (villagers outraged after topless bloke climbs sacred tree in viral video tstsb)

दरम्यान, हे प्रकरण बाली, इंडोनेशियामधील (Indonesia) आहे. Tabanan येथील केलिसी केलोद गावात एक पवित्र वृक्ष आहे. सॅम्युअल लॉकटन नामक ऑस्ट्रेलियन व्यक्ती हा व्हिडिओ बनवण्यासाठी शर्ट न घालता या पवित्र वृक्षावर चढला. नंतर त्याने हा व्हिडिओ टिकटॉकवरही शेअर केला.


Shirtless
Sudan: दारफुरमध्ये जातीय हिंसाचार, 100 जणांचा मृत्यू; 20 हून अधिक गावात भीषण आग

तसेच, सॅम्युअलच्या या हरकतीमुळे स्थानिक लोक संतापले. त्यांनी सॅम्युअलच्या विरोधात पोलिस (Police) ठाण्यात तक्रार नोंदवली. तबानानचे पोलिस प्रमुख, पोलिस ग्रँड कमिशनर अ‍ॅडज्युटंट रानेफ्लाय डियान कँड्रा यांनी सांगितले की, अबियंटुवुंग गावातील नागरिकांनी (Citizens) सॅम्युअलची तक्रार केली आहे.

त्यानंतर सॅम्युअलला पोलिस सेक्टर ऑफिसमध्ये नेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, हे वृक्ष पवित्र आहे, हे मला माहित नव्हते. मी फक्त एक छंद म्हणून या वृक्षावर चढलो, जसे मी आपल्या देशात करतो.


Shirtless
बांगलादेशच्या कंटेनर डेपोला भीषण आग,16 ठार, 450 हून अधिक जखमी

दुसरीकडे, सॅम्युअलच्या टिकटॉक व्हिडिओमध्ये, तो वृक्षावर चढताना आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग करताना दिसत आहे. सॅम्युअलने आपली चूक मान्य केली असून माफीही मागितली आहे. त्यानंतर स्थानिकांनी सॅम्युअलकडे 3 हजार नुकसान भरपाईची मागणी केली. ज्यामधून गुरु पिदुका सोहळा पार पाडता यावा, ही एक प्रकारची परंपरा आहे, ज्याद्वारे निसर्गाची झालेली हानी भरुन काढली जाते.

मात्र, त्यावेळी सॅम्युअलकडे फक्त 800 रुपये होते. पुढील आठवड्यापर्यंत उर्वरित पैसे देण्याचे ठरले आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणाले की, इथल्या नेत्यांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी हा निर्णय मान्य केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com