पर्यटकांचा आनंद क्षणात भूकंपाच्या धक्क्याने भितीत बदलला...पाहा Viral Video

सोशल मिडियावर पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लाऊडस्पीकरवर घोषणा होताच शेकडो लोक लगेच जमिनीवर बसलेले दिसत आहे.
Viral Video
Viral VideoDainik Gomantak

Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण अलिकडे सोशल मिडियावर पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लाऊडस्पीकरवर घोषणा होताच शेकडो लोक लगेच जमिनीवर बसलेले दिसत आहे.

याआधी लाऊडस्पीकरवर अनाउन्समेंट होते. ही घटना २६ मे ला जपानमध्ये घडली आहे. त्या दिवशी ६.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. NHK जपानच्या म्हणण्यानुसार, टोकियोमधील इमारती हादरल्या होत्या. आजूबाजूच्या परिसरालाही याचा फटका बसला आहे.

त्याचवेळी, हा व्हिडिओ डिस्नेलँडमध्ये आलेल्या पर्यटकांचा आहे. ट्विटरवर जेफ्री जे हॉल नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सुरुवातीला काही लोक उद्यानात फिरताना दिसतात. 

लाऊडस्पीकरवर काही सेकंदात भूकंपाचा इशारा दिला जातो. त्यामुळे लोक जिथे उभे आहेत तिथे थांबतात आणि जमिनीवर बसतात. हा व्हिडिओ शेअर झाल्यापासून दोन लाख लोकांनी पाहिला आहे.

Viral Video
Turkey Election 2023: एर्दोगान पुन्हा एकदा बनले तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष, सलग 11व्यांदा जिंकली निवडणूक
  • व्हिडिओचे कॅप्शन

या व्हिडिओच्या कॅप्शन लिहिले आहे, ''सावधान! तीव्र भूकंपाचे धक्के जाणवु शकतात, सर्वजण सावध राहा!'' टोकियो डिस्नेलँडची भूकंप यंत्रणाने ही सुचना दिली आहे.

या व्हिडिओवर अनेक युजर्स कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'बहुतेक जपानी लोक भूकंप केंद्राचे अंतर, खोली आणि ताकद याचा अंदाज लावू शकतात. बऱ्याच बाबतीत घाबरण्याची गरज नाही. दुसर्‍या युजरने सांगितले की, 'हा एक आठवड्यापूर्वी भूकंपाच्या धक्क्यापेक्षा जास्त तीव्र भूकंप होता.' 

तिसऱ्या यूजरने व्हिडीओ शेअर करताना आपला अनुभव शेअर केला, 'हे धोकादायक होते, चालताना काय चालले आहे आणि लोक काय बोलत आहेत हे आम्हाला समजत नव्हते. शेवटी लक्षात आले की हा खरा भूकंप आहे. 

चौथा युजर्स म्हणाला, 'मी ट्रेनमध्ये होतो आणि मला माहित नव्हते.' भूकंपामुळे कोणतीही दुखापत किंवा नुकसान झाल्याचे वृत्त नाही, असे आणखी एका अहवालात म्हटले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू चिबाच्या किनाऱ्याजवळ होता. इबाराकी प्रांतालाही याचा फटका बसला आहे. त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com