अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा व्हायरल व्हिडिओ 

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 23 मार्च 2021

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी असलेल्या विशेष विमानाची शिडी चढत असताना चार- पाच पायऱ्या चढल्यानंतर बायडन यांचा तोल गेला.

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ते विमानाची शिडी चढताना तीन वेळेस पायऱ्यांवर पडताना दिसतायेत. अमोरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी असलेल्या एअरफोर्स वन या विशेष विमानाची शिडी चढताना तीन वेळेस पडल्यावरही बायडन यांनी स्वत:ला सावरंल. सुदैवाने त्यांना इजा नाही झाली.

बायडन आशियाई समुदयाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी अटलांटा दौऱ्यावर निघाले होते. अटलांटा जाण्यासाठी ते एअरफोर्स वन या विमानाची शिडी चढत होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी असलेल्या विशेष विमानाची शिडी चढत असताना चार- पाच पायऱ्या चढल्यानंतर बायडन यांचा तोल गेला. आणि ते पायऱ्यांवरच पडले. पण एकदा नाही तर त्यानंतर पुन्हा दोन वेळेस शिडी चढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु दोन्ही वेळेस त्यांचा तोल गेला. पहिल्या दोन वेळेस त्यांनी स्वत:ला सावरलं, पण ते तिसऱ्यांदा ते गुडघ्यावर पडले. तिसऱ्यांदा पायरीवर पडल्यानंतर त्यांनी स्वत:ला सावरत दोन्ही हातांनी साइड रेलिंगचा आधार घेत, विमानाच्य़ा प्रवेशद्वाराजवळ गेले.

कॅनडात महात्मा गांधींचा बर्फाचा पुतळा, 2022 मध्ये होणार अनावरण; पाहा PHOTO

‘बायडन ज्यावेळी शिडी चढत होते त्यावेळी जोरदार वारा वाहत होता. त्यामुळे त्यांचा तोल जात असावा. पण ते पूर्णत: निरोगी आहेत,’ असं व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आलं आहे.

 

संबंधित बातम्या