रशिया-युक्रेन युद्धात हस्तक्षेप खपवून घेणार नाही - व्लादिमीर पुतिन

युक्रेनला पाठिंबा देणाऱ्या देशांवर हल्ला करण्याची पुतीन यांची धमकी
Vladimir Putin
Vladimir PutinDainik Gomntak

संपुर्ण जग हे रशिया-युक्रेन युद्धामूळे होत असलेल्या जीवित आणि अर्थिक हानीच्या झळा सोसत आहे. तर दुसऱ्या बाजूला रशिया-युक्रेन युद्ध संपायला तयार नाही. या युद्धामध्ये जगभरातील अनेक राष्ट्रे आपआपली भुमिका घेत आहेत. यावरच धाडसी वक्तव्य करत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशिया-युक्रेन युद्धात 'हस्तक्षेप खपवून घेणार नाही असं स्पष्ट केलं आहे.

( Vladimir Putin says We will attack the countries that support Ukraine )

Vladimir Putin
Ukraine war: "नरसंहार", रशियन हल्ल्याचा कॅनडा खासदारांनी केला निषेध

रशियाकडून युक्रेनवर होत असलेल्या हल्ल्यांदरम्यान पुतिन यांनी पाश्चात्य देशांना इशारा दिला आहे. आमच्या स्पेशल ऑपरेशनमध्ये कोणत्याही पाश्चात्य देशाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास रशिया त्या देशांवर हल्ला करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे पुतीन यांनी म्हटले आहे. युक्रेनविरुद्धच्या युद्धात कोणत्याही देशाने हस्तक्षेप केल्यास हल्ला करण्याची धमकी पुतिन यांनी दिली आहे. तसेच युद्धात हस्तक्षेप करण्‍याचा निर्णय घेणाऱ्या देशांवर तात्काळ हल्ला करण्‍याची सर्व साधने रशियाकडे आहेत असही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

Vladimir Putin
पाकिस्तानी बोटीतून 280 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, दिल्ली-यूपी कनेक्शन असण्याची शक्यता

युक्रेनविरुद्ध सुरू असलेल्या आमच्या युद्धात हस्तक्षेप करून रशियाला धोका निर्माण करण्याचा कोणाचा हेतू असेल, तर ते आम्हाला मान्य नाही, असे पुतीन म्हणाले. असे झाले तर आम्ही त्या देशांना प्रत्युत्तर देऊ. पुतिन म्हणाले की, हे करण्यासाठी आमच्याकडे पुरेशी शस्त्रे आहेत. ते म्हणाले की, आम्हाला गर्व नाही, पण गरज पडली तर आम्ही त्याचा वापर करू जेणेकरून सर्वांना याची माहिती होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com