Vladimir Putin: 'हुकूमशहा वेळोवेळी बदललेले आहेत; युद्धात रशिया पराभूत झाली तर पुतीन यांना...'- रशियन मुत्सद्द्याचे मोठे वक्तव्य

Vladimir Putin: ते आपल्या समर्थकांच्या गरजा भागवू शकला नाही, तर समर्थक निघून जातील.
Vladimir Putin
Vladimir Putin Dainik Gomantak

Vladimir Putin: युक्रेन-रशियातील युद्ध एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही सुरुच आहे. या युद्धामुळे रशिया-युक्रेनचे जेवढे नुकसान झाले आहे तसेच त्याचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थेवरदेखील झाला आहे. संपूर्ण जगभरातून रशियाने हे युद्ध थांबवावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

अमेरिकेसह युरोपीय राष्ट्रांनी रशियाने युद्धाला सुरुवात केल्याबद्दल रशियाच्या व्यापारावर प्रतिबंध घातला गेला आहे. मात्र तरीही या प्रतिबंधाला न जुमानता रशियाने हे युद्ध सुरुच ठेवले आहे.

आता रशिया-युक्रेन युद्धाबाबत एक मोठे वक्तव्य समोर आले आहे. तज्ञांनी रशियाबद्दल आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याविषयी अंदाज वर्तवायला सुरुवात केली आहे.

Vladimir Putin
SIPRI Report: शस्त्रास्त्र खरेदीत भारत पुन्हा अव्वल, पाकिस्तान आठव्या स्थानावर पोहोचला!

गेल्या वर्षी युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू झाल्यानंतर जाहीरपणे राजीनामा देणारे बोरिस बोंडारेव्ह यांनी न्यूजवीकला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की , "व्लादिमीर पुतिन काही सुपरहिरो नाहीत... त्यांच्याकडे कोणतीही महासत्ता नाही... ते एक किरकोळ हुकूमशहा आहे...यांची जागा दुसरे कोणाही घेऊ शकते.

पुढे बोलताना बोरिस बोंडारेव्ह यांनी म्हटले आहे की, इतिहासावर नजर टाकली तर दिसून येईल की हुकूमशहा वेळोवेळी बदललेले दिसतात. त्यामुळे जर ते युद्धात पराभूत झाले आणि ते आपल्या समर्थकांच्या गरजा भागवू शकला नाही, तर समर्थक निघून जातील.

बोरिस बोंडारेव्ह हे जिनिव्हा येथील रशिया( Russia )च्या राजनैतिक मिशनमध्ये शस्त्रास्त्र नियंत्रण तज्ज्ञ म्हणून काम करत होते. ते एकमेव रशियन मुत्सद्दी होते ज्यांनी युद्धाविरोधात जाहीर राजीनामा दिला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com