मध्य आफ्रिकेत ज्वालामुखीचा उद्रेक; भीतीने नागरिकांचे स्थलांतर

मध्य आफ्रिकेत ज्वालामुखीचा उद्रेक; भीतीने नागरिकांचे स्थलांतर
congo Volcano.jpg

कांगो : मध्य आफ्रिका खंडातील (Central Africa)  कांगो (Congo) देशातील गोमा (Goma) मध्ये एका ज्वालामुखी पर्वताचा उद्रेक झाल्याची माहिती समोर आली आहे.  कॉंगोच्या गोमा शहरात माउंट नीरागोंगो (Nyiragongo volcano) पर्वतात  या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. ज्यामुळे शहरातील नागरिक  प्रचंड घाबरले असून ज्वालामुखीच्या स्फोटामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.  ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर संपूर्ण आकाश लाल झाले असून आता हा ज्वालामुखी शहरात पसरला आहे. ज्वालामुखीच्या विस्फोटांमुळे  शहरातील हजारो लोक सुरक्षित ठिकाणी पोहचण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.  (Volcanic eruptions in Central Africa; Citizens flee in fear) 

स्थानिकांचे प्रशासनावर आरोप 
दरम्यान, ज्वालामुखीच्या विस्फोटाच्या पार्श्वभूमीवर  प्रशासनाने  परिसर सोडण्याचे कोणतेही आदेश दिले नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच, गोमा शहराला  दुसर्‍या प्रांताशी जोडणार्‍या महामार्गावर लाव्हा पसरला असल्याने नागरिकांची प्रचंड अडचण झाली आहे. त्याचबरोबर ज्वालामुखी फुटल्यामुळे आतापर्यंत  किती लोकांनी  प्राण गमावले, याचीही माहिती अद्याप प्रशासनाने दिली नसल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शिनी केला आहे. 
 
20 वर्षानंतर ज्वालामुखीचा उद्रेक 
2002 मध्ये  कोंगो मध्ये असाच ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. त्यावेळी शेकडो लोक मरण पावले होते. ज्वालामुखीचा लाव्हा विमानतळाच्या सर्व धावपट्टी पर्यंत  पोहचला होता.  तथापि, यावेळी  संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेने ज्वालामुखी फुटल्यानंतर शहराचे एक चित्र ट्वीट केले आहे.   आपल्या विमानांद्वारे या भागावर लक्ष ठेवून असून आम्ही सावध असल्याची माहिती स्थानिक माध्यमांद्वारे दिली  आहे.  

दरम्यान जगभरात कोविड 19 पाठोपाठ वेगवेगळी संकटे उभी  उभी राहत आहेत  आहेत. एकीकडे संपूर्ण जग कोविड 19 चा सामना करता असून दुसरीकडे भारतासह जगातील काही देशात भूकंप आणि ज्वालामुखीचे संकट उभे ठाकले आहे.  भारतात भूकंपाचे सौम्य झटके बसले आहेत, तर चीनमधील युन्नान प्रांतात भूकंपाने तीन जणांचा मृत्यू आणि अनेक लोक गंभीर जखमी  झाले आहेत. तर अंटार्क्टिकामध्ये शेकडो वर्षांपूर्वीचा आईसबर्ग वेगळा झाला आहे. यानंतर आता  गोमामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकाने जगासमोर एक नवे संकट उभे राहिले आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com