Volcano In Indonesia Video: इंडोनेशियात महाकाय ज्वालामुखीचा उद्रेक, जपानमध्ये त्सुनामीची शक्यता

जावा बेटावर हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे.
Volcano In Indonesia
Volcano In IndonesiaDainik Gomantak

इंडोनेशियात रविवारी पहाटे सेमेरू हा महाकाय ज्वालामुखीचा स्फोट ((Volcano Erupts In Indonesia) झाला. हा उद्रेक एवढा मोठा आहे की ज्वालामुखीच्या राखेचा लोळ हवेत 1.5 किमीपर्यंत वरती गेला आहे. इंडोनेशियातील अधिकाऱ्यांनी स्थानिक रहिवाशांना उद्रेक क्षेत्रापासून दूर राहण्याचा सूचना केली आहे. जावा बेटावर हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे.

BNPB ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, पहाटे 2:46 वाजता (1946 GMT) ज्वालामुखीचा उद्रेक झाला. याबाबत एक व्हिडिओ समोर आला असून, यात ज्वालामुखीचा उद्रेक झालेल्या भागात राखेचे ढग दिसत आहेत.

Volcano In Indonesia
Goa Corona Update: गोव्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने, शनिवारी केवळ एक नवीन रूग्ण

इंडोनेशियाच्या आपत्ती निवारण एजन्सी, BNPB ने रहिवाशांना उद्रेक केंद्राच्या 5 किमीच्या आत कोणतीही जाऊ नये. तसेच, लावा प्रवाहाचा धोका असल्यामुळे नदीकाठापासून 500 मीटर अंतरावर राहण्याचा इशारा दिला आहे.

Volcano In Indonesia
Pak Army Video: पहिल्याच LOC दौऱ्यात पाकच्या नव्या लष्करप्रमुखांची भारताला धमकी, पाहा काय म्हणाले

दरम्यान, या स्फोटानंतर जपानच्या हवामानशास्त्र एजन्सी सतर्क झाल्या असून, स्फोटानंतर त्सुनामी येण्याच्या शक्यतेवर लक्ष ठेवले जात आहे. (Japan Monitors Possibility Of Tsunami)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com