दररोज 7000 पावले चालून वाढते वय, वाचा हा नवीन स्टडी

दररोज 7,000 पावले (7,000 steps a day) चालण्याने मृत्यूचा धोका 50 ते 70 टक्क्यांनी कमी होत असल्याचे समोर आले आहे.
दररोज 7000 पावले चालून वाढते वय, वाचा हा नवीन स्टडी
WalkingDainik Gomantak

फिटनेससाठी डॉक्टर नेहमी चालण्याचा सल्ला देतात. यातच आता एका नव्या अभ्यासानुसार, दररोज 7,000 पावले (7,000 steps a day) चालण्याने मृत्यूचा धोका 50 ते 70 टक्क्यांनी कमी होत असल्याचे समोर आले आहे. हा अभ्यास जपानी जामा नेटवर्क ओपन (JAMA Network Open) जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या अभ्यासातून स्पष्ट होते की, दिवसातून कमीतकमी 7,000 पावले चालणे मध्यम वयोगटातील लोकांमध्ये इतर विविध कारणामुळे होणारे मृत्यू आणि अकाली मृत्यूचा (Premature Death) धोका 50 % ते 70 टक्क्यांनी कमी होत असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, फिजिकल एक्टिविटी एपिडेमायोलॉजिस्ट आणि स्टडीचे प्रमुख तसेच प्रख्यात लेखिका अमांडा पलुच (Amanda Paluch) यांनी सांगितले की, 10,000 पेक्षा जास्त पावले चालणे किंवा वेगाने चालणे कोणत्याही अतिरिक्त फायद्याचा पुरावा देत नाही. त्यांनी जपानी पेडोमीटरसाठी (Japanese pedometer) सुमारे दशकभर चाललेल्या मार्केटिंग मोहिमेचा भाग म्हणून 10,000 पावले चालण्याने कोणत्याही अतिरिक्त लाभ मिळत नसल्याचे सांगितले आहे. मात्र अहवालात असे म्हटले आहे की, जे लोक दररोज 7,000 ते 9,000 पावले चालतात त्यांना आरोग्य उत्तम राखण्यामध्ये मोठा लाभ झाल्याचे सांगण्यात आले आहे, परंतु जे दररोज 10,000 पेक्षा जास्त पावले चालतात त्यांना कोणतेही अतिरिक्त लाभ मिळालेले दिसून आलेले नाही.

Walking
आईच्या क्रूरतेचा कळस, मुलीची उंची वाढवण्यासाठी मारायला लावल्या 3,000 उड्या

शास्त्रज्ञांना त्यांच्या अभ्यासातून आढळले की, जे लोक दररोज सरासरी 7,000 पावले चालतात त्यांना इतर कोणत्याही कारणामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका 50 ते 70 टक्के कमी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com