युद्ध टळले! 11 दिवसांच्या संघर्षानंतर इस्राइल-हमासमध्ये समझोता 

युद्ध टळले! 11 दिवसांच्या संघर्षानंतर इस्राइल-हमासमध्ये समझोता 
israel hamas ceasefire end.jpg

गाझा : इस्राइल आणि हमास (Israel and Hamas) यांच्यातील हवाई हल्ल्यांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. गुरुवारी दोघांनीही  युद्धबंदीवर (ceasefire end)  सहमती दर्शविली.  11 दिवस चाललेल्या या युद्धामुळे गाझा पट्टीत प्रचंड दहशत पसरली होती.  तर इस्राइलमध्येही जनजीवन विस्कळीत झाले होते. या संघर्षात 200 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला.  इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांच्या सुरक्षा मंत्रिमंडळाने गाझा (Gaza) पट्टीमधील 11 दिवस चालणार्‍या लष्करी कारवाईला आळा घालण्यासाठी एकतर्फी युद्धबंदीला मान्यता दिली. आमरिकेच्या दबावानंतर इस्राइल आणि हमास मधील हा संघर्ष थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्थानिक  माध्यमांनी म्हटले आहे.  (The war is over! Israel-Hamas settlement after 11 days of conflict) 

तर, इस्त्राइली लष्करी प्रमुख आणि अन्य उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांच्या शिफारसीनंतर इजिप्तच्या युद्धबंदीचा प्रस्ताव एकमताने  मान्य करण्यात आल्याची माहिती  इस्राइलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या कार्यालयाने दिली आहे.   विशेष म्हणजे या  युद्धादरम्यान, इस्रायलने अभूतपूर्व  कामगिरी केल्याचेही सांगण्यात आले आहे.  दरम्यान, गाझा आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार,  10 मेपासून इस्राइलने गाझा येथे शेकडो हवाई हल्ले केले.  तर हमासने आतापर्यंत इस्त्राइली शहरांवर चार हजाराहून अधिक रॉकेट डागले. या संघर्षात  किमान 230 पॅलेस्टाईनियन मरण पावले, ज्यात 65 मुले आणि 39 महिलांचा समावेश आहे. त्याच वेळी 1,710 लोक गंभीर जखमी झाले. तर, दुसरीकडे, इस्राईलमध्ये 5 वर्षांचा मुलगा आणि 16 वर्षाची मुलगी यासह 12 लोक मृत्युमुखी पडले.  इस्राइलने गुरुवारी गाझा पट्टीवर हमासविरूद्ध केलेल्या हवाई हल्ल्यात एक पॅलेस्टिनी नागरिक ठार झाला तर अनेक लोक  जखमी झाले. 

- उत्तर गाझामधील निर्वासित छावणीवर हवाई हल्ले
तसेच, गुरुवारी (ता.20)  गाझाच्या खान युनिस भागातील इमारत आणि रफा भागात तीन हमास कमांडरांच्या घरांना लक्ष्य करून ते उधवस्त करण्यात आले.  या हल्ल्यात खान युनूसमधील दुमजली इमारतीच्या बाहेर झोपलेले 11 लोक जखमी झाले. याशिवाय उत्तर गाझामधील निर्वासित लष्करी छावणीतिल शस्त्रास्त्राचा साठाही उद्ध्वस्त करण्यात आल्याच  इस्त्रायली सैन्याने सांगितले आहे.  इतकेच नव्हे तर तेल अवीववरील रॉकेट हल्ल्यात वापरण्यात आलेले दोन भूमिगत लाँचरही या हल्ल्यात उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती इस्रायली सैन्याने दिली आहे. 

- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून कौतुक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी इस्रायली-गाझा युद्धबंदीची पुष्टी केली आहे. त्याचबरोबर दहशतवादी गटांपासून आपला बचाव करण्यासाठी अमेरिकेने इस्राईलला पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर बायडेन यांनी युद्धबंदीबद्दल इस्राइलचे कौतुक केले.  आपल्याला पुढे जाण्याची खरी संधी आहे आणि त्यासाठी मी काम करण्यास वचनबद्ध आहे.' असं जो बायडन यांनी म्हटल आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com