जगण्याचा अनोखा मार्ग; 24 हजार वर्षांपासून बर्फात असूनही 'तो' जिवंत बाहेर आला

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जून 2021

जगातील सर्वात थंड ठिकाण आर्क्टिक पेर्मॅफ्रॉस्टकडून(Arctic Permafrost) वैज्ञानिकांनी हा लहान प्राणी काढला आहे. तो बर्फात गोठलेला होता. जिवंत होताच त्याने स्वतःसारखा दुसरा प्राणीही निर्माण केला. त्याचे वय सुमारे 24 हजार वर्षे असेल.

निसर्गात(Nature) देखील एकापेक्षा एक चमत्कारीक गोष्टींचा अनूभव घ्यायला मिळतो. या निसर्गाच्या आत आणखी काय काय दडलयं हे कुणालाच नाही माहित. जिथे एखादी व्यक्ती 100 वर्षांच्या वयापर्यंत आपली समज आणि मानसिक संतुलन गमावण्यास सुरवात करते आणि तिथेच एखादा प्राणी 24 हजार वर्षापासून काहीही न खाता थंड थडग्यात पडून रोहतो. निसर्गात अढळलेल्या अशा काही गोष्टी आणि प्राणी चमत्कारापेक्षा कमी नसतात. जेव्हा वैज्ञानिकांनी (Russia scientists) त्याला बाहेर काढले तेव्हा तो जिवंत आणि ठणठणीत होता. बाहेर येताच त्याने स्वत:च आपल्यासारखाच एक जॉम्बी तयार केला.(Was buried in snow for 24 thousand years yet came out alive)

हा पराक्रम रशियामध्ये घडला आहे. जगातील सर्वात थंड ठिकाण आर्क्टिक पेर्मॅफ्रॉस्टकडून(Arctic Permafrost) वैज्ञानिकांनी हा लहान प्राणी काढला आहे. तो बर्फात गोठलेला होता. जिवंत होताच त्याने स्वतःसारखा दुसरा प्राणीही निर्माण केला. त्याचे वय सुमारे 24 हजार वर्षे असेल. आणि तरीही तो जिवंत होता आणि स्वतःला वाचवण्यासाठी त्याने बर्फात स्वत:ला गोठवले होते.

विरोधी पक्षनेत्याच्या मारली कानाखाली; हा इम्रान खानचा नवा पाकिस्तान आहे 

हजारो वर्षे बर्फात राहिल्यानंतरही कोणताही परिणाम झाला नाही
हे मायक्रोस्कोपिक जॉम्बी जीव आहेत, जे आपल्या पृथ्वीच्या वेगवेगळ्या पाण्याच्या ठिकाणी 50 दशलक्ष वर्षांपासून आढळतात. जिथून त्यांला जीवाला काढले गेले आहे तेथे अत्यंत थंड आणि सर्वत्र बर्फाळ वातावरण आहे. मात्र, या प्राण्यांच्या शरीरावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, त्याला डेलॉइड रोटीफर्स(Bdelloid Rotifers) किंवा व्हील एनिमल(Wheel Animals) म्हणतात. हे अनेक पेशीं असलेले सूक्ष्म जीव आहेत. त्यांच्या तोंडाजवळ केसांचा गुच्छा राहतो. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हिमयुगाच्या काळात, सामान्यत: स्वच्छ पाण्यात राहणारे हे प्राणी पर्माफ्रॉस्टमध्ये गोठलेले असतात.

राष्ट्राध्यक्ष बायडन फायझर लसी करणार दान; G-7 बैठकीत होऊ शकते घोषणा 

जगण्याचा अनोखा मार्ग
यापूर्वी, रशियन शास्त्रज्ञांना असे रोटिफायर्स आढळले आहेत, जे उणे 20 अंश तापमानात 10 वर्षे जगू शकतात. यावेळी त्यांना एक रोटीफर मिळाला आहे, जो सायबेरियन परमफ्रॉस्टमध्ये पुरला गेला आणि तो हजारो वर्षांपूर्वीचा आहे. प्लेइस्टोसीन एपो कालावधीचे हे प्राणी 12 हजार ते 26 लाख वर्षांपूर्वी पाहिले गेले असावेत. स्वत: ला गोठवण्याने त्यांचे अस्तित्व आणि जगण्याचा मार्ग मोकळा होतो.

जिवंत होताच क्लोन बनविणे सुरू केले
बडेलॉइड रोटीफर्सला जन्म देण्यासाठी कोणत्याही जोडीदाराची आवश्यकता नाही, कारण ते  अलैंगिक आहे. अशा परिस्थितीत शास्त्रज्ञांनी त्यांना जिवंत बनविताच त्यांनी स्वत: चे क्लोन बनवण्यास सुरवात केली. जिथे हा जीव सापडला आहे तिथली जमीन खूपच मजबूत झाली आहे. अशा परिस्थितीत, त्यामध्ये राहणारा कोणताही सजीव किंवा मृत प्राणी कित्येक वर्षे सुरक्षित राहू शकेल.

संबंधित बातम्या