New York मधील 'हे' प्रसिद्ध उद्यान स्मशानभूमीवर उभं आहे; उद्यानाखाली आहेत 20 हजारांहून अधिक मृतदेह

गरीब, असहाय्य आणि बेघर लोकांच्या मृतदेहांना दफन करण्यासाठी ही जागा वापरली जात होती.
New York मधील 'हे' प्रसिद्ध उद्यान स्मशानभूमीवर उभं आहे; उद्यानाखाली आहेत 20 हजारांहून अधिक मृतदेह

न्यूयॉर्कमधील वॉशिंग्टन स्क्वेअर (Washington Square Park) हे जगातील सर्वात गजबजलेले उद्यान आहे. दिवसरात्र येथे नेहमीच लोकांची वर्दळ असते. हाजारों पर्यटकही या उद्यानाला भेट देत असतात. रोषणाई, मनमोहक परिसर, झाडे-फुले या उद्यानाकडे लोकांना आकर्षित करत असतात. पण, तुम्हाला माहिती आहे का ही हे उद्यान एका स्मशानभूमीवर बांधण्यात आले आहे. वॉशिंग्टन स्क्वेअर उद्यानाखाली हजारो मृतदेह पुरण्यात आले आहेत. गरीब, असहाय्य आणि बेघर लोकांच्या मृतदेहांना दफन करण्यासाठी ही जागा वापरली जात होती.

New York मधील 'हे' प्रसिद्ध उद्यान स्मशानभूमीवर उभं आहे; उद्यानाखाली आहेत 20 हजारांहून अधिक मृतदेह
Sindhudurg: चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव यांना कुडाळ पोलिसांचे नोटीस

कार्मेन निग्रो यांनी न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररीसाठी लिहिलेल्या एका लेखात याबाबत खुलासा करण्यात आला आहे. 1797 ते 1820 या काळात या जागेचा उपयोग केवळ स्मशानभूमी म्हणून केला जात होता. ही जमीन स्वस्तात मिळाली, म्हणून शहर प्रशासनाने ही संपूर्ण जमीन अवघ्या 4,500 डॉलरमध्ये विकत घेतली. तेव्हापासून 200 वर्षांनंतरही या उद्यानाबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. अनेकांनी येथे भूत पाहिल्याचा दावा देखील केला आहे.

न्यूयॉर्कमधील वॉशिंग्टन स्क्वेअर उद्यानात अनेकवेळा अचानक तीव्र थंडी आणि नंतर उष्णता जाणवते. तसेच, धुक्यात विचित्र आकार दिसतात. असा दावा एनवायसी घोस्ट्स नावाच्या संस्थेने केला आहे. न्यूयॉर्कमध्ये, 1797 नंतर, सुमारे 6 वर्षे, पिवळा ताप या आजारामुळे अनेकांचा मृत्यू झाला. त्यामुळे लोकांना दफन करायला जागा मिळत नव्हती. त्यादरम्यान या उद्यानात हजारो मृतदेह पुरण्यात आले होते. न्यूयॉर्क पोस्टचे संस्थापक अलेक्झांडर हॅमिल्टन यांनी स्मशानभूमी विकसित होत असल्याचे कळल्यावर आक्षेप घेतला. याबाबत अनेकांनी नगर प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. खोदकाम सुरू झाल्यावर एकामागून एक मृतदेहांचे अवशेष बाहेर येऊ लागले.

New York मधील 'हे' प्रसिद्ध उद्यान स्मशानभूमीवर उभं आहे; उद्यानाखाली आहेत 20 हजारांहून अधिक मृतदेह
Somalia Bombings: सोमालियामध्ये भीषण बॉम्बस्फोट; 100 ठार, 300 जखमी

उद्यानाच्या उत्तर-पश्चिम प्रवेशद्वाराजवळील झाड 350 वर्षे जुने असल्याचे अनेकांचे मत आहे. या झाडावर अनेक गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात आली. 1825 मध्ये या उद्यानाला स्मशानभूमीऐवजी सार्वजनिक उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. उत्खनन केले तेव्हा येथे सांगाडा सापडला. 2013 मध्येही उद्यानाच्या एका कोपऱ्यात दोन सांगाडे सापडले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com