Taliban: 'आम्हाला अमेरिकेबरोबर व्यापारी संबंध निर्माण करायचे आहेत'

आम्हाला आशा आहे की, त्यांनी काबूलमधील (Kabul) दूतावास पुन्हा सुरु करावे. तसेच आम्हाला त्यांच्याबरोबर व्यावसायिक संबंधही पुन्हा नव्याने निर्माण करता येतील.” असेही ते यावेळी म्हणाले.
Jabihulla Mujahid
Jabihulla MujahidDainik Gomantak

अमेरिकेने (America) अफगाणिस्तानमधील (Afghanistan) लष्करी कारवाई मंगळवारी सकाळी काबूलमध्ये (Kabul) शेवटच्या उड्डाणासह समाप्त केली आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानामधून सैन्य माघार घेतल्याने 20 वर्षांची मोहीम अखेर संपली आहे. दरम्यान, तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद (Jabihulla Mujahid) म्हणाले की, अमेरिकेने काबूलमधील राजनैतिक मिशन पुन्हा सुरु करावे अशी आमची अपेक्षा आहे. "काबुलमध्ये अमेरिकेची केवळ राजनयिक उपस्थिती असावी. आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्यास सक्षम आहोत. आम्हाला आशा आहे की, त्यांनी काबूलमधील दूतावास पुन्हा सुरु करावे. तसेच आम्हाला त्यांच्याबरोबर व्यावसायिक संबंधही पुन्हा नव्याने निर्माण करता येतील.” असेही ते यावेळी म्हणाले.

1990 च्या दशकात पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया वगळता इतर कोणत्याही देशाने तालिबान सरकारला मान्यता दिली नव्हती. मात्र आता अफगाणिस्तानमध्ये स्थापन होत असलेल्या तालिबानी सरकारला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून अधिकृत मान्यता मिळावी अशाही त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Jabihulla Mujahid
अफगाणिस्तानातून सैन्य माघारीचा निर्णय योग्यच:जो बायडन

तालिबानने आपला विजय साजरा केला

दुसरीकडे, तालिबानने मंगळवारी आपला विजय साजरा केला. अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या माघारीनंतर अनेक दशकांच्या युद्धानंतर देशात शांती आणि सुरक्षा आणण्याच्या त्यांच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला. दरम्यान, देशातील अफगाण नागरिक तालिबानी शासन कोणत्या प्रकारचे असणार याची वाट पाहत आहेत. दुसरीकडे अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्याच्या पूर्ण माघारीनंतर, तालिबान समोर आता 38 दशलक्ष लोकसंख्येच्या देशावर राज्य करण्याचे आव्हान आहे, जे मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून आहे.

Jabihulla Mujahid
अखेर अमेरिकेची अफगाणिस्तानातून पूर्णपणे माघार, 20 वर्षांनंतर सैन्य मायदेशी

उड्डाण केल्यानंतरही 200 अमेरिकन देशात राहिले

1990 च्या उत्तरार्धात महानगरांमध्ये स्थायिक असलेल्या लोकसंख्येवर इस्लामी राजवटी कशाप्रकारे लादण्यात आली होती, तशाच प्रकारे तालिबान आताही बंधने लादेल अशी भिती अफगाण नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या आधी काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन शेवटच्या अमेरिकन सैन्याच्या विमान उड्डाणानंतर अमेरिका आणि त्याच्या सहयोगींसाठी काम करणारे हजारो लोक तसेच 200 अमेरिकन लोक देशात राहिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com