'लडाख संदर्भात चीन सोबत चर्चा हवी' 

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

भारताने  लडाखमधील  स्थिती पाहता  मोठया  प्रमाणावर  सैन्य  तैन्यात  केले  आहे. पूर्व  लडाखमधून  सैन्य  माघार घेण्या संदर्भात  भारत  आणि  चीनच्या  वरिष्ठ  लष्करी  कमांडर्सच्या  बऱ्याच  बैठका  झाल्या आहेत.

नवी दिल्ली: भारत  आणि  चीनमध्ये  गेल्यावर्षी  लडाखमध्ये  सीमावाद  सुरु  झाल्यापासून आतापर्यंत  लष्करी चर्चेच्या  नऊ  फेऱ्या झाल्या आहेत. भारताने  लडाखमधील  स्थिती पाहता  मोठया  प्रमाणावर  सैन्य  तैन्यात  केले  आहे. पूर्व  लडाखमधून  सैन्य  माघार घेण्या संदर्भात  भारत  आणि  चीनच्या  वरिष्ठ  लष्करी  कमांडर्सच्या  बऱ्याच  बैठका  झाल्या आहेत. यासंदर्भात  जो  पर्यंत  निर्णय  होत  नाही, तो  पर्यत  चर्चा सुरु  राहील, असे परराष्ट्र मंत्री  जयशंकर  यांनी  म्हटले आहे.

परराष्ट्र  मंत्री  जयशंकर  आणि  संरक्षण  मंत्री  राजनाथ  सिंह  यांनी  चीनचे  परराष्ट्र  मंत्री आणि  संरक्षण  मंत्र्यांसोबत वरिष्ठ पातळीवर चर्चा  केली  आहे. परंतु  त्यातुन  काहीही  साध्य झालेले  नाही. आतापर्यंत झालेल्या चर्चेतून कोणत्याही  प्रकारचा  बदल  दिसून आलेला नाही,  असे  विजयवाडा  येथे  जयशंकर  यांनी  पत्रकारांशी संवाद साधताना  सांगितले. ''सैन्य  माघारीचा  विषय  हा  खूप  किचकट  मुद्दा  आहे. तुम्हाला भौगोलिक  स्थिती  आणि  तिथे  काय घडतयं  याची माहिती असली पाहिजे. हे  सर्व  लष्करीअधिकारीच ठरवतील'' असे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितले.

पाकिस्तानचे पंतप्रधान सवयीचे गुलाम; आवळला पुन्हा कश्मीरी राग

सीमेवर  दोन्ही  देशाच्या  सैनिकांमध्ये  झालेल्या  चकमकीमुळे  मंत्री  स्तरावर  चर्चा  होणार का?  या  प्रश्नावर  जयशंकर  यांनी  हे  उत्तर  दिले. ''मागच्यावर्षीच्या पाच मे पासून दोन्ही देशांमध्ये पूर्व लडाख सीमेवर वाद सुरु आहे. मागच्यावर्षीच्या घडामोडींनंतर लडाखमध्ये निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण मोठया प्रमाणावर सैन्य तैन्यात केल्याचे जयशंकर यांनी सांगितले.'' दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत लष्करी आणि कुटनितीक पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत, पण आतापर्यंत त्यातून काहीही निर्णय झालेले नाही.

संबंधित बातम्या