‘फूट नको, एकता हवी’

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

ज्यांना फूट नको, एकता हवी आहे; पक्षाच्या दृष्टीकोनातून देशातील राज्यांची विभागणी न करता ‘युनायटेड स्टेट्‌स’ पहायचे आहे, त्या सर्व अमेरिकी नागरिकांचा मी अध्यक्ष होईन , असे आश्‍वासन अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिले.

वॉशिंग्टन : ज्यांना फूट नको, एकता हवी आहे; पक्षाच्या दृष्टीकोनातून देशातील राज्यांची विभागणी न करता ‘युनायटेड स्टेट्‌स’ पहायचे आहे, त्या सर्व अमेरिकी नागरिकांचा मी अध्यक्ष होईन , असे आश्‍वासन अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आज दिले. देशात प्रचंड ध्रुवीकरण झाले असून हे ‘दडपशाहीचे युग’ तातडीने संपविण्याचे आवाहनही त्यांनी जनतेला केले. 
अत्यंत चुरशीच्या झालेल्या अध्यक्षपदाच्या लढतीत रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केल्यानंतर नियोजित उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासह बायडेन यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला. आपल्या मूळ गावी, डेलावर राज्यातील विलिंग्टन या गावी जनतेसमोर भाषण केले. अध्यक्षपदासाठी केलेल्या तिसऱ्या प्रयत्नात ते यशस्वी ठरले. 

संबंधित बातम्या