Israel: भारताच्या निवडणुकीत दखल देणारे टीम जॉर्ज प्रकरण नेमकं काय आहे ?

Israel: आपल्या खोट्या नावाने अर्थात जॉर्ज या नावाने ही संस्था चालवतो.
AI
AIDainik Gomantak

Israel: इस्त्राइलच्या हेरगिरी करणाऱ्या कंपनीवर भारतासोबत 30 देशांच्या निवडणुकीत दखल दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. इस्त्राइलची हेरगिरी करणारी कंपनी एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून भारतासोबत अनेक देशांमध्ये बनावट सोशल मिडिया अभियान चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.

ब्रिटनच्या 'द गार्डियन' या वर्तमानपत्रासोबतच एका पत्रकारसंघाच्या आंतरराष्ट्रीय तपासात ही माहिती समोर आली आहे.टीम जॉर्ज असे या हेरगिरी करणाऱ्या कंपनीचे नाव असून ही कंपनी आपल्या ग्राहकांना अॅडव्हान्स इपॅक्ट मीडीया सोल्यूशन( Aims )नावाचे सॉफ्टवेअर विकते.

मिळालेल्या माहितीनुसार, ही संस्था माजी इस्त्राइल स्पेशल फोर्स ऑपरेटिव्ह 50 वर्षीय ताल हनानद्वारा चालवली जाते. हा व्यक्ती आपल्या खोट्या नावाने अर्थात जॉर्ज या नावाने ही संस्था चालवतो.

टीम जॉर्जवर हॅकिंग, तोडफोड त्याबरोबरच ऑनलाईन माध्यमातून खोट्या बातम्या पसरवत असल्याचे आरोप आहेत. टीम जॉर्जच्या या पडताळणीत फ्रान्स( France )च्या फॉरबिडन स्टोरीज या संस्थेचादेखील सहभाग आहे जी गौरी लंकेश यांच्या प्रेरणेने काम करत होती.

AI
David Malpass: मोठी बातमी! जागतिक बँकेच्या प्रमुखांनी दिला राजीनामा, हवामान बदलावर...

गेल्या काही महिन्यांपासून टीम जॉर्ज सॉफ्टवेअरच्या माध्यमातून इंटरनेटवर लक्ष ठेऊन होती.या माध्यमातून वेगवेगळ्या देशांच्या निवडणुकीत या टीम जॉर्जने दखल दिली आहे, असेही या अभ्यासात म्हटले आहे. यामध्ये युके, भारत, कॅनडा( Canada),जर्मनी,युएइ या देशांसोबतच आणखी 20 देशांचा समावेश होता. टीम जॉर्ज पडताळणा करण्यामध्ये जगभरातील नामांकित 30 पत्रकारांचा समावेश होता. दरम्यान, टीम जॉर्जने या सर्व आरोपांना फेटाळून लावले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com