WhatsApp यूजर्सच्या प्रायव्हसीचा भंग नाही ; नव्या पॉलिसीबाबत स्पष्टीकरण

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

  नव्या प्रायव्हसी धोरणामुळे वादात सापडलेल्या व्हॉट्‌सॲपने आज या बदलांबाबत स्पष्टीकरण देताना यूजर्संच्या मनातील शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला.

नवी दिल्ली :  नव्या प्रायव्हसी धोरणामुळे वादात सापडलेल्या व्हॉट्‌सॲपने आज या बदलांबाबत स्पष्टीकरण देताना यूजर्संच्या मनातील शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. या नव्या धोरणामुळे यूजर्संच्या खासगीपणाचा कसल्याही प्रकारचा भंग होणार नाही. एखाद्या व्यक्तीने कुटुंबीयांना पाठविलेले खासगी संदेश पूर्णपणे सुरक्षित राहतील असे व्हॉट्सॲपच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. कोणती माहिती फेसबुकवर शेअर केली जाणार नाही, याची माहिती देणारी नियमावली व्हॉट्सॲपकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. 
बिझिनेससंदर्भातील (व्यावसायिक कारणांसाठी) मेसेजिंगसाठीच हे नवे नियम लागू असतील असे कंपनीकडून सांगण्यात आले.

यांचे फेसबुकवर शेअरिंग नाही

  • व्हॉट्सॲप खासगी मेसेज पाहू शकत नाही किंवा कॉलही ऐकतनाही.फेसबुकलाही शक्य नाही.
  • कॉलिंग करणारी अथवा संदेश पाठविणाऱ्या व्यक्तीचे लॉग्ज ठेवण्यात    येतात
  • व्हॉट्सॲप आणि फेसबुक तुम्ही शेअर केलेले लोकेशन पाहू शकत नाही.
  • व्हॉट्सॲप तुमचे संपर्क क्रमांक फेसबुकशी शेअर करत नाही व्हॉट्सॲपचे ग्रुप हे खासगीच राहतात
  • तुम्ही तुमचे मेसेज गायब होतील अशी सेटिंग करू शकता तुम्ही स्वतः डेटा डाऊनलोड करू शकताखासगीच

    यूजर्संच्या मनात व्हॉट्सॲप ग्रुपच्या प्रायव्हसीबाबत असलेल्या शंकांचेही समाधान करण्याचा प्रयत्न कंपनीकडून करण्यात आला आहे. आम्ही हा डेटा फेसबुक ॲडसोबत शेअर करत नाही. हे सगळे सांकेतिक भाषेने संरक्षित असल्याने कंपनी ते पाहू शकत नाही, असेही नव्या निवेदनात म्हटले आहे. अतिरिक्त प्रायव्हसीअंतर्गत संबंधित मेसेज चॅटमधून अदृश्‍य व्हावेत, अशी सोय देखील यूजर्संना करता येईल. दरम्यान व्हॉट्सॲपने आपली माहिती फेसबुकसोबत शेअर करण्याचे नियोजन आखले असून या संदर्भातील नव्हे प्रायव्हसी धोरण यूजर्संसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. या बदलाला अनेकांनी आक्षेप घेतला आहे

संबंधित बातम्या