व्हॉट्सअ‍ॅप घेऊन येणार नवीन फिचर

दैनिक गोमंतक
मंगळवार, 13 एप्रिल 2021

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये व्हॉट्सअ‍ॅप या लोकप्रिय मेसेजिंग अॅपने डीसअपेअरिंग मेसेज हे फिचर आणले होते. आता कंपनी या फिचरमध्ये आणखी काही नवीन फिचर्स जोडणार असल्याचे समजते आहे.

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये व्हॉट्सअ‍ॅप  या लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपने डीसअपेअरिंग मेसेज हे फिचर आणले होते. आता कंपनी या फिचरमध्ये आणखी काही नवीन फिचर्स जोडणार असल्याचे समजते आहे. नव्या अहवालानुसार, कंपनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या सदस्यांना सुद्धा मेसेज डीसअपेअर करण्याचे अधिकार देणार आहे. हे फीचर आल्यानंतर आपल्याला काय फायदा होईल ते जाणून घेऊया. ( WhatsApp will bring a new feature )

चीनच्या मनात नेमके आहे तरी काय? ड्रॅगनकडून क्षेपणास्त्रांची तैनाती सुरूच   

डब्ल्यू.ए.बेटा.इन्फो. ने दिलेल्या माहिती नुसार या नवीन फिचरमुळे  व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या ऍडमिन सोबतच ग्रुपचे सदस्य सुद्धा एखादा मेसेज डीसअपेअर करू शकणार आहेत. अर्थात तुम्ही एखाद्या  व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे सदस्य असाल तर नव्या फीचरच्या माध्यमातून तुम्हीदेखील ग्रुपमधील मेसेज डीसअपेअर करू शकणार आहात. सध्या ही सुविधा केवळ ग्रुप एडिमनपुरती मर्यादित आहे.

डीसअपेअरिंग मेसेज या फीचरचे वैशिष्ट्य 

हे नवीन फिचर अपडेट केल्यानंतर एखाद्याने पाठवलेला मेसेज 7 दिवसानंतर डीसअपेअर होणार आहे. तर एखाद्या युजरला मिळालेला मेसेज कॉपी करता येणार असून त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेता येणार आहे. पर्सनल आणि ग्रुप चॅट अशा दोन्हीही ठिकाणी हे फिचर लागू होणार असून विशेषतः फॉरवर्ड केलेल्या मेसेजसाठी हे फिचर लागू होणार नाही.  मिळालेल्या माहितीनुसार व्हॉट्सअ‍ॅप (whatsapp) सध्या नवीन फिचर्सची (New Feature)चाचणी करते आहे. हे परीक्षण अलीकडील बीटा आवृत्ती अँड्रॉइड 2.21.8.7 मध्ये केले जात आहे.

संबंधित बातम्या