Missile Technology: चीन अन् पाकच्या क्षेपणास्त्र तळांबाबत या अहवालातून मोठा खुलासा

China Pakistan Missile: NTI.ORG नावाची वेबसाइट जी जगभरातील घातक शस्त्रांबद्दल अपडेट करत राहते.
China Army
China ArmyDainik Gomantak

Missile Defense System Technology: आजच्या काळात ज्या प्रकारे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे, हे पाहून सर्व देशांनी स्वसंरक्षणासाठी आपली लष्करी क्षमता वाढवण्यास सुरुवात केली आहे. NTI.ORG नावाची वेबसाइट जी जगभरातील घातक शस्त्रांबद्दल अपडेट करत राहते. या वेबसाइटने चीन आणि पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र तळांबाबत मोठा खुलासा केला आहे. कोणत्याही देशाचा क्षेपणास्त्र तळ ही एक अतिशय गुप्त जागा असते, जिथे ते आपल्या देशाची क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्रे ठेवतात. वेबसाइटवर चीन आणि पाकिस्तानच्या गुप्तचर तळाची माहिती देण्यात आली आहे.

NTI.ORG काय आहे

दरम्यान, चीन आणि पाकिस्तानच्या (Pakistan) गुप्तचर क्षेपणास्त्र तळांची माहिती देताना एनटीआयच्या वेबसाइटने सांगितले की, चीनकडे चार क्षेपणास्त्र तळ आहेत. त्यापैकी दोन अ‍ॅक्टिव, एक ऑपरेशनल आणि एक अद्याप बांधकामाधीन आहे. चीनमधील (China) या प्रक्षेपण केंद्रामध्ये जिउक्वान स्पेस लॉन्च सेंटर, तैयुआन स्पेस लॉन्च सेंटर, झिचांग स्पेस लॉन्च सेंटर आणि हेनान स्पेस लॉन्च सेंटर यांचा समावेश आहे. हे चारही अतिशय प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत.

China Army
China President Xi Jinping: शी जिनपिंग नजरकैदेत? चीनमध्ये चर्चेला आलं उधाण

दुसरीकडे, पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र तळाबाबत वेबसाईटने म्हटले आहे की, 'पंजाबमधील सरगोधा येथे पाकिस्तानी क्षेपणास्त्रांचा (Missiles) तळ आहे. यासोबतच 2 धावपट्ट्याही येथे आहेत. हे तेच ठिकाण आहे, जिथे पाकिस्तान शस्त्रास्त्रे ठेवतो.

China Army
China: Xi Jinping रचणार इतिहास, माओनंतर बनणार सर्वात शक्तिशाली नेते!

चीनकडे एकापेक्षा घातक शस्त्रे आहेत

चीन आणि तैवानमधील (Taiwan) वाद ज्याप्रकारे वाढत चालला आहे, चीन दररोज आपली लष्करी ताकद दाखवत आहे. यासोबतच चीन आपली लष्करी ताकदही वाढवत आहे. नॅन्सी पेलोसी यांच्या नुकत्याच झालेल्या तैवान दौऱ्यामुळे चीन चांगलाच संतापला होता. त्यांच्या या भेटीनंतर अनेक चिनी लढाऊ विमाने तैवानजवळ घिरट्या घालताना दिसली होती. आज चीनकडे जगातील सर्वात मोठे सैन्य आहे. दुसरीकडे, भारत आणि पाकिस्तानचा इतिहासही फारसा चांगला राहिलेला नाही. या दोन देशांचे लष्करी सामर्थ्य वाढणे भारतासाठी धोक्याची घंटा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com