अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्डच्या लसीला WHO ची मान्यता 

WHO.jpg
WHO.jpg

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोविड -19 या लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. याशिवाय साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी डब्ल्यूएचओच्या मदतीने, जगभरातील देशांमध्ये कोट्यावधी डोस पोहोचले  जातील असेही म्हटले आहे.  संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य खात्याने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनानुसार,  सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि दक्षिण कोरियाच्या अ‍ॅस्ट्रॅजेनेका-एसकेबायो या संस्थेमार्फत बनविल्या जाणार्‍या अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसीला तातडीने मान्यता दिली आहे. (WHO approval of AstraZeneca and Oxford vaccines) 

डब्ल्यूएचओने अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या कोविड -19  लसीला दिलेल्या मान्यतेमुळे, आता गरीब देशांनाही लसी पुरवल्या जातील.  जगभरात आणीबाणीच्या वापरासाठी मंजूर झालेल्या लसीमध्ये सीरम संस्थेद्वारे भारतात एक लस बनविली जाते. तर दुसरी दक्षिण कोरियाची कंपनी आहे.  कोवाक्स कार्यक्रमांतर्गत ही लस आता संपूर्ण जगाला उपलब्ध होईल, अशी प्रतिक्रिया डब्ल्यूएचओ प्रमुख टेड्रोस अ‍ॅधानोम यांनी दिली आहे.  दरम्यान,  यापूर्वीच केंद्र सरकारने  पुणे येथील सीरम संस्थेने तयार केलेल्या कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन  वापरास  ग्रीन सिग्नल दिला आहे. त्याचबरोबर,  संपूर्णपणे स्वदेशी बनावटीची भारत बायोटेकद्वारे निर्मित कोव्हॅक्सीन लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. या दोन लसींच्या सहाय्याने भारतात लसीकरण कार्यक्रमही सुरू झाला आहे. दरम्यान, कोविड-19 लस निर्मित कंपन्या लस तयार करण्यात व्यस्त आहेत आणि त्या प्राथमिक चाचणीच्या विविध टप्प्यात आहेत.  येत्या काही महिन्यांतच आम्ही भारताला नवीन लस देऊ शकू, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. 

युरोपमधील बनावट लसीच्या विक्रीपासून सावधान 
युरोपियन युनियन (ईयू) चे एंटी फ्रॉड आर्म, ओलाएफ यांनी कोविड -19 लस पुरवठ्यात विलंब  झाल्यामुळे काहीजण बनावट लसीची विक्री करण्याची ऑफर देत आहेत. अशी बनावट लसीची विक्री करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा दिल आहे.  युरोपिय युनियन सरकारांना लस पुरवठा करण्याची ऑफर देत काही लोकांनी  फसणवून केल्याची तक्रारी त्यांना मिळाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर  ओलाएएफ हा इशारा दिला आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com