WHO ने 'मॉडर्ना' लसीला आपत्कालीन वापरासाठी दिली मंजूरी

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 3 मे 2021

आता जगाला कोरोना (कोरोनाव्हायरस) महामारीविरुध्द लढण्यासठी आणखी एका कोरोना लस मिळाली आहे.

जगभरात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाटही आली आहे. भारतात वाढत्या कोरोना संसर्गामुळे अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले तसेच काही राज्यांनी लॉकडाऊन लावण्याचा पर्याय निवडला आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे जगभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यातच आता जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) अमेरिकेच्या मॉडर्ना (Moderna) लसीला आपत्कालिन वापरासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता जगाला कोरोना (कोरोनाव्हायरस) महामारीविरुध्द लढण्यासठी आणखी एका कोरोना लस मिळाली आहे. (WHO approves Modern vaccine for emergency use)

जागतिक आरोग्य संघटनेनं आत्तापर्यंत एस्ट्राजेनेका, फायजर-बायोटेनटेक आणि जॉनसन आणि जॉनसनच्या लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. अमेरिकेची मॉडर्ना लस यामध्ये नवी आहे. येणाऱ्या काळामध्ये चीन निर्मित सिनेफॉर्मा आणि सिनेव्हॉक लसींना देखील आपत्कालिन वापरासाठी परवानगी जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता मिळू शकते.

Corona: चीनने फोटो शेअर करत केला भारताचा अपमान

डब्ल्यूएचओचे मुख्य कार्यकारी अधिकारी (मुख्य कार्यकारी अधिकारी) स्टीफेन बेंसेल यांनी सांगितले की, मॉडर्ना लसीला मान्यता मिळवण्यासाठी अनेक महिन्यांची प्रतिक्षा करावी लागली.  याचे मुख्य कारण म्हणजे मॉडर्ना कंपनीकडून आकड्यांची उपलब्धता होण्यासाठी खूप वेळ गेला. हे आकडे जागतिक आरोग्य संघटनेला अखेर शुक्रवारी उपलब्ध झाल्यानंतर मॉडर्ना लसीला मान्यता देण्यात आली.

संबंधित बातम्या