कोट्यावधी जिंकणारी 'जगातील सर्वोत्तम नर्स', आहे तरी कोण?

Anna Qabale Duba यांना जगातील सर्वोत्कृष्ट परिचारिका म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
कोट्यावधी जिंकणारी 'जगातील सर्वोत्तम नर्स', आहे तरी कोण?
Anna Qabale DubaDainik Gomantak

Anna Qabale Duba यांना जगातील सर्वोत्कृष्ट परिचारिका (Nurse) म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. 24,000 हून अधिक स्पर्धकांना मागे टाकत तिने हे विजेतेपद पटकावले आहे. एस्टर गार्डियन्स ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड जिंकल्याबद्दल, तिला सुमारे 2 कोटी रुपयांचे बक्षीसही देण्यात आले आहे. (Who is the best nurse in the world who has won billions)

Anna Qabale Duba
पाकिस्तानी कुटुंबीयांचं किळसवाणं कृत्य, 'आपल्याच देशातील महिलेला...'

केनिया येथील रहिवासी असलेल्या Anna Qabale Duba यांनी कमी वयात विवाह आणि स्त्री जननेंद्रियाच्या उत्परिवर्तनाविरोधात मोहीम राबवून जगभरात चर्चेचा विषय झाली आहे. त्यांनी नर्सिंग क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. आदल्या दिवशी ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड जिंकल्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

पुरस्कार जिंकल्यानंतर अण्णा कबालेच्या आनंदाला सिमा उरली नाही आणि जेव्हा तिला $250,000 (रु. 1 कोटी 94 लाख) चे बक्षीस मिळाले तेव्हा ती क्षणभर 'बोलकी' झाली आणि म्हणाली की, ती म्हणाली- 'हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्यानंतर मी खूप आनंदी झाले आहे. हे जगभरातील परिचारिकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देते, हे व्यासपीठ सर्वांनी ओळखले पाहिजे. हा पुरस्कार सोहळा दुबईत पार पडला आहे.

Anna Qabale Duba
ट्विटर खरेदीच्या कराराला एलन मस्क यांच्याकडून स्थगिती; पराग अग्रवाल यांची माहिती

अण्णा कबालेचे सहाय्यक म्हणतात की ती Marsabit शहरातील तिच्या Pastoralist समुदायाला मदत करण्यासाठी मैलांचा प्रवास करायची. गावातल्या मुलांसाठी ती शाळाही चालवत होती. बीबीसीशी बोलताना अण्णा कबाले म्हणतात की, 'हा पुरस्कार मला संपूर्ण केनियामध्ये माझ्या शाळेचा विस्तार करण्यास मदतीस येईल.'

तिच्याच गावातली एकमेव पदवीधर-शिक्षित मुलगी!

31 वर्षीय केनियन नर्स म्हणाली की ती तिच्या गावातली एकमेव पदवीधर-शिक्षित मुलगी आहे. ती Epidemiology मध्ये पदव्युत्तर पदवीधर आहे आणि अण्णा कबाले तरुण मुली आणि महिलांना सक्षम तसेच शिक्षित करण्यासाठी काम करत आहे. स्वतः अण्णांनाही वयाच्या 14 व्या वर्षी लग्न करण्यास भाग पाडण्यात आले, परंतु ती कशीबशी त्यातून सुटली. स्त्री जननेंद्रियाचे विच्छेदन आणि बालविवाह यांसारख्या गोष्टींविरोधात काम करत राहणार असल्याचे अण्णां कबालेचेच म्हणणे आहे. अण्णा कबाले विवाहित आहेत आणि त्यांना एक मूल देखील आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.