कोरोनाचं मानवाकडून प्राण्यांमध्येही संक्रमण; डब्ल्यूएचओचा धक्कादायक दावा 

दैनिक गोमन्तक
सोमवार, 5 एप्रिल 2021

चीनच्या वुहान शहरात सर्वप्रथम आढळलेल्या कोरोना विषाणूने आतापर्यंत संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातलेला आहे. या विषाणूने सगळ्यांनाच वेठीस धरले आहे. अशातच आता हा विषाणू मानावातून प्राण्यांमध्ये देखील पसरण्याची शक्यता असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोनाचा विषाणू हा मानवाकडून प्राण्यांमध्ये संक्रमित होण्याच्या शक्यतेची पुष्टी केली आहे. डब्ल्यूएचओने यासंदर्भात बोलताना कोरोना मानवातून मांजर, कुत्रा, सिंह आणि वाघ यांच्यात पसरण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. डब्ल्यूएचओच्या प्रतिनिधी रुसिया मेलीटा वुझ्नोविक यांनी आज याबाबत सांगितले. (The WHO claims that corona can be transmitted from humans to animals)

चीनच्या वुहान शहरात सर्वप्रथम आढळलेल्या कोरोना विषाणूने आतापर्यंत संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातलेला आहे. या विषाणूने सगळ्यांनाच वेठीस धरले आहे. अशातच आता हा विषाणू मानावातून प्राण्यांमध्ये देखील पसरण्याची शक्यता असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. कोरोनाचा विषाणू हा आतापर्यंत मानवातून मानवात पसरल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र मानवाकडून प्राण्यांमध्ये देखील कोरोनाच्या विषाणूचे संक्रमण झाल्याचे पुरावे असून हा विषाणू झुनोटिक विषाणू असल्याचे डब्ल्यूएचओच्या प्रतिनिधी रुसिया मेलीटा वुझ्नोविक यांनी म्हटले आहे.    

पुतिन यांची सत्तेतील पकड होणार अधिक घट्ट; नव्या कायद्यांना दिली मंजुरी

एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत डब्ल्यूएचओच्या (WHO) प्रतिनिधींनी याबाबतची माहिती दिली. शिवाय, अद्याप एक इंटरमिजिएट होस्ट मिळाला नसल्याचे देखील त्यांनी या मुलाखतीत नमूद केले आहे. तसेच, कोरोना संक्रमित लोकांच्या संपर्कात आलेल्या मांजर, कुत्रा, सिंह आणि वाघ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती रुसिया मेलीटा वुझ्नोविक यांनी दिली आहे. आणि त्यानंतर इतर प्राण्यांच्या विषाणूच्या परिणामाचा अभ्यास करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

त्यानंतर, संभाव्य प्राण्यांमधील प्रभाव शोधण्यासाठी आणि भविष्यात होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोणते प्राणी सर्वात जास्त या विषाणूमुळे बळी पडतात हे समजणे महत्वाचे आहे असल्याचे या आरोग्य तज्ञाने सांगितले. याव्यतिरिक्त, कोरोना संक्रमित असणाऱ्यांनी पाळीव प्राण्यांशी आपला संपर्क मर्यादित ठेवण्याची शिफारस रुसिया मेलीटा वुझ्नोविक यांनी केली आहे. इतकेच नाही तर, कोरोनाचे (Corona) संक्रमित व जोखीम असलेल्यांनी पाळीव प्राण्यांशी अधिक संपर्क ठेवल्यास विषाणू मानवांमधून प्राण्यांच्या मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. आणि विषाणूमध्ये अनुवांशिक बदल होऊन पुन्हा या बदलांमुळे मानवांना संक्रमित झालेल्या आजाराचे संभाव्य परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.  

संबंधित बातम्या