कोण आहे हा 'बाबा' ज्याच्या आश्रमात आढळले 11 मृतदेह

भक्त मूत्र प्यायचे, श्लेष्मा आणि विष्ठा खायचे
कोण आहे हा 'बाबा' ज्याच्या आश्रमात आढळले 11 मृतदेह
11 dead bodies found ashram thawee nanraDanik Gomantak

थायलंडमध्ये पोलिसांनी एका कथित बाबाला अटक केली असून, थावी नानरा असे या व्यक्तीचे नाव असून त्याचे वय 75 वर्षे आहे. या भोंदू बाबांबद्दल दावा करण्यात आला आहे की, त्याचे अनुयायी त्यांचे मूत्र प्यायचे आणि त्यांची विष्ठाही खात. असे केल्याने रोगांपासून बचाव होतो असा या अनुयायांचा दावा आहे.

रिपोर्टनुसार, या बाबाला उत्तर थायलंडमधील छैयाफुम जंगलातील त्याच्या घरी अटक करण्यात आली. पोलीस या बाबाला ताब्यात घेत असताना बाबाच्या अनुयायांनी पोलिसांविरूध्द बंड केले होते. बाबाच्या आश्रमाजवळ 11 मृतदेह सापडले आहेत. जे बाबांच्या अनुयायांचे मृतदेह असल्याचे मानले जात आहे.

 11 dead bodies found ashram thawee nanra
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, 4 दहशतवाद्यांना अटक

वृत्तानुसार, थावी नानरा यांच्या आश्रमावर छापा टाकण्यात आला होता, यात असे आढळून आले की त्यांनी जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे आणि कोविड नियमांचे उल्लंघन केले आहे. वृत्तानुसार, जे मृतदेह बाहेर काढण्यात आले ते सर्व शवपेटीमध्ये होते. त्यापैकी केवळ 5 मृतदेहांचे मृत्यू प्रमाणपत्र मिळाले आहे.

भक्त मूत्र प्यायचे, श्लेष्मा आणि विष्ठा खायचे

वृत्तानुसार, या अहवालात असे म्हटले आहे की त्यांनी स्वतःला सर्व धर्मांचा पिता असल्याचा दावा केला आहे. थवी येथे गेलेली 80 वर्षीय महिला परत आलीच नाही. या महिलेच्या मुलीने देखील याची माहिती दिली आहे. अनुयायी लघवी पितात, श्लेष्मा आणि विष्ठा देखील खातात जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचा रोग होऊ नये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.