WHO च्या कर्मचाऱ्यांचे लाजिरवाणे काम; नोकरीच्या बदल्यात ठेवले लैंगिक संबंध

डब्ल्यूएचओचे (WHO) कर्मचारी इबोला साथीचा सामना करण्यासाठी कांगोला गेले होते त्यावेळी, त्यांनी तेथील अनेक महिला आणि मुलींवर लैंगिक अत्याचार केले.
WHO च्या कर्मचाऱ्यांचे लाजिरवाणे काम;  नोकरीच्या बदल्यात ठेवले लैंगिक संबंध
Tedros Adhanom GhebreyesusDainik Gomantak

आफ्रिकन देश (African Countries) असलेल्या कांगोमध्ये (Congo) जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) 21 कर्मचाऱ्यांवर महिला आणि अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वतंत्र तपासातून हा मोठा खुलासा करण्यात आला आहे. या घटना कांगोमध्ये 2018 ते 2020 पर्यंत घडल्या होत्या. डब्ल्यूएचओचे कर्मचारी इबोला साथीचा सामना करण्यासाठी कांगोला गेले होते त्यावेळी, त्यांनी तेथील अनेक महिला आणि मुलींवर लैंगिक अत्याचार केले.

अहवालात काय आहे?

एका स्वतंत्र अहवालानुसार, 2018 मध्ये इबोला महामारी (Ebola Epidemic) रोखण्यासाठी गेलेल्या WHO च्या टीमने कांगोमधील काही महिला कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी मुलाखती घेतल्या. कांगोतील एका 43 वर्षीय महिलेने सांगितले की, मी आपल्या क्षेत्रात इबोलाबाबत जनजागृती करण्यासाठी गेली होती, परंतु तेथे मुलाखत घेणाऱ्याने माझ्याकडे लैंगिकतेची मागणी केली. त्यावेळी मी नकार दिल्यानंतर माझ्यावर त्याने जबरदस्तीने बलात्कार केला. कांगोतील इतर दुर्गम भागातील स्त्रियांच्या बाबतीत अशाच विदारक घटना घडल्या आहेत.

Tedros Adhanom Ghebreyesus
WHO कडून साथीच्या रोगांवर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

WHO प्रमुखांनी 'हे' सांगितले

आरोपांची पुष्टी झाल्यानंतर, WHO प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. ते म्हणाले की, गुन्हेगारांना शिक्षा देणे हे आमचे प्राधान्य असणार आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचेही तपासातून पथकासमोर आले आहे.

Tedros Adhanom Ghebreyesus
Delta Variant: लस न घेतलेल्या लोकांना धोका अधिक- WHO

कर्मचाऱ्यांनी नोकरीचे आश्वासन दिले

इबोला साथीच्या काळात महिलांचे लैंगिक शोषण करणारे सुमारे 83 लोक सापडले. यापैकी 21 डब्ल्यूएचओचे कर्मचारी होते. पीडितांना मदतीसाठी गेलेले हे कर्मचारी महिलांना त्यांच्या ड्रिंक्समध्ये मादक द्रव्यांचा वापर करुन लैेंगिक शोषण करत. तर काही महिलांचे नोकरीच्या आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचेही समोर आले आहे.

पीडित महिलांनी असेही सांगितले की, लैंगिक अत्याचारादरम्यान आरोपींनी गर्भनिरोधक न वापरल्याने नंतर त्यांना गर्भपातासाठी पुढे दबाव आणण्यात येत असे. तर काही पीडित महिलांनी पुढे सांगितले की, डॉक्टरांनी त्यांना नोकरीचे आश्वासन देऊन त्यांच्यावर बलात्कार केला होता. या घटनेचा तपास सुरु झाल्यानंतर सुमारे 50 महिलांनी डब्ल्यूएचओच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे, इबोला साथीच्या वेळी, कांगोमध्ये सुमारे दोन हजार लोकांचा मृत्यू झाला.

Related Stories

No stories found.