कोरोनासाठी ‘डब्ल्यूएचओ’ची नियमावली: शालेय विद्यार्थ्यांना मास्क लावण्याची सूचना

पीटीआय
रविवार, 30 ऑगस्ट 2020

कोरोनामुळे जगभरातील व्यवहार लॉकडाउनच्या काळात थांबले होते. आत लॉकडाउन शिथिल झाल्याने अनेक देशांत शाळाही सुरू होऊ लागल्या आहे.

जीनिव्हा: कोरोनामुळे जगभरातील व्यवहार लॉकडाउनच्या काळात थांबले होते. आत लॉकडाउन शिथिल झाल्याने अनेक देशांत शाळाही सुरू होऊ लागल्या आहे. यामुळे ६ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांनी काही विशिष्ट परिस्थितीत मास्क लावण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात मदत होऊ शकेल, असेही संघटनेने म्हटले आहे. 

प्रौढांमुळे कोरोनाचे संक्रमण ज्या वेगाने होते, तेवढा धोका १२ वर्षांखालील मुलांपासून उदभवत नाही, असा समज पसरल्याने ‘डब्ल्यूएचओ’ने सोमवारी (ता.२४) शिफारशी केल्या. मुले ज्या भागात राहतात, तेथे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला असला तर त्यांनी मास्क घालणे आवश्‍यक आहे. मास्कचा सुरक्षित वापर करण्याची मुलांची क्षमता लक्षात घ्यायला हवी. मास्क घालवा अथवा काढताना मोठ्या माणसे उपस्थित असावीत. 

सुदैवाने कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने सौम्य प्रमाणात हा आजार झालेल्या व लक्षणे नसतानाही कोरोनाची लागण झालेल्या मुलांची संख्या मोठी आहे, ही चांगली बाब आहे, असे मत संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्‍य संघटनेच्या तातडीच्या कार्यक्रमाच्या प्रमुख मारिया व्हॅन केरकोव्ह यांनी व्यक्त केले. पण अजूनही काही मुलांवर कोरोनामुळे गंभीर स्थिती ओढवू शकते, अगदी मृत्यूही होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

संबंधित बातम्या