WHO: दुसरे वर्ष पहिल्या वर्षापेक्षा अधिक प्राणघातक

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 15 मे 2021

कोवॅक्स ही कोरोना लसीसंबधीत जागतिक युती आहे. प्रत्येक देशात लस पोहचविणे हा त्याचा हेतू आहे, जेणेकरुन कोरोना जगातून पूर्णपणे नष्ट होऊ शकेल. या युतीचे नेतृत्व जीएव्हीआय(GAVI) करीत आहे.

जिनिव्हा: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुन्हा एकदा जगाला कोरोनाव्हायरसविषयी(Corona) सावध केले आहे.  कोरोना साथीचे दुसरे वर्ष अधिक घातक सिद्ध होणार आहे. त्याचबरोबर त्यांनी श्रीमंत देशांना, गरीब देशांना प्रथम लस(Vaccine) देण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरुन ते कोरोना परिस्थितीला सामोरे जावू शकतील, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. कॅनडा(Canada) आणि अमेरिका(America) यांनी नुकतेच 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना लसी देण्यास मान्यता दिली आहे, तर भारतामध्ये(INDIA) मुलांच्या लसींच्या चाचण्यांना मान्यता देण्यात आली आहे.(WHO The second year of the Covid 19 is more deadly than the first year)

असे घेबियस​ यांनी सांगितले 
साथीच्या रोगाचे दुसरे वर्ष हे पहिल्या वर्षापेक्षा अधिक प्राणघातक ठरणार आहे. म्हणून श्रीमंत देशांनी सध्याच्या काळात मुलांना लसीकरण टाळून गरीब देशांना मदत केली पाहिजे. काही देशांना मुले आणि पौगंडावस्थेतील मुलांना लस का घ्यायची आहे हे मी समजू शकतो, परंतु आत्ता मी त्यांना आवाहन केले आहे की त्यांनी यावर पुनर्विचार करावा आणि त्याऐवजी कोवॅक्स दान करावे.' असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रॉस यांनी केले आहे.

श्रीमंत देशांनी आपल्या मुलांचे लसीकरण करण्याआधी विचार करावा; WHO चा सल्ला 

भारताच्या स्थितीबद्दल चिंता
भारत सध्या कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेचा सामना करीत आहे. येथे कोरोना संसर्गाने ज्या वेगाने पसरत आहे त्याने संपूर्ण जग हादरवून टाकले आहे. भारत देशाविषयी बोलताना डब्ल्यूएचओ प्रमुख म्हणाले की, भारतातील परिस्थिती चिंताजनक आहे, रुग्णालयात दाखल होण्याची आणि मृत्यूची संख्या वाढत आहे. या कठीण काळात भारताला मदत करणार्‍या सर्व भागीदारांचे आम्ही आभार मानतो.

‘’कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवणं योग्य’’ 

कोवाक्स म्हणजे काय?
कोवॅक्स ही कोरोना लसीसंबधीत जागतिक युती आहे. प्रत्येक देशात लस पोहचविणे हा त्याचा हेतू आहे, जेणेकरुन कोरोना जगातून पूर्णपणे नष्ट होऊ शकेल. या युतीचे नेतृत्व जीएव्हीआय(GAVI) करीत आहे. जीएव्हीआय ही एपिडेमिक प्रिपेयर्डनेस इनोवेशन (CEPI)आणि डब्ल्यूएचओची(WHO) युती आहे. डब्ल्यूएचओ वारंवार श्रीमंत देशांना गरीब देशांनाही पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करुन देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करत असतो.

संबंधित बातम्या