WHO ने लसीकरणासाठी भारताकडे मागितली मदत

vaccinetion 2.jpg
vaccinetion 2.jpg

जगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid 19) वाढत असताना आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जागतिक स्तरावर कोरोना लसीकरणाचा (Vaccination) वेग वाढवण्यासाठी भारताकडे (India) मदत मागितली आहे. अनेक देशांमध्ये लसींच्या तुटवड्यामुळे लसीचा दुसरा डोस देताना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनी सीरम इन्स्टिट्यूटकडे (Serum Institute) मदत मागितली आहे. अॅस्ट्राझेनेकाच्या (AstraZeneca) कोविशिल्ड (Covishield) लसीची सीरम इन्स्टिट्यूट जगातील सर्वात मोठी उत्पादक आहे. (WHO seeks India help in vaccination)

30 ते 40 देशांमध्ये लसींचा तुटवडा
अनेक देशांमध्ये कोविशील्ड लसीचा एक डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसची कमतरता आहे. लसींची कमतरता तीस ते चाळीस देशांमध्ये आहे. यावर मात करण्यासाठी भारत सरकार आणि सीरमकडे लस देण्यासाठी मदत मागण्यात आली आहे.  लॅटीन अमेरिका, आफ्रिका, मध्य पूर्व आणि दक्षिण आशिया या देशांमध्ये लसीची कमतरता आहे असे जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ सल्लागार ब्रुस आइलवर्ड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

श्रीलंका नेपाळसारख्या देशांमध्ये कोरोनाच्या लाटा
भारताच्या शेजारी देश असणाऱ्या श्रीलंका आणि नेपाळसारख्या देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. कोवॅक्स मोहिमेअंतर्गत जागतिक आरोग्य संघटनेने अलिकडच्या काही महिन्यांत जागतिक स्तरावर 80 दशलक्षांपेक्षा जास्त कोरोना लसींचे डोस उपलब्ध केले आहेत. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तुटवडा जाणवत आहे. याआगोदर देखील जगातील बऱ्याच देशांना भारताने लसी पुरवल्या आहेत.

लसीच्या पुरवठ्याच्या मागणीला वेग
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले, कोरोना लसींचा पुरवठा पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी भारत सरकार आणि अॅस्ट्राझेनेका-सीरम यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे. ज्या देशांमध्ये कोरोना लसींचा तुटवडा आहे त्या देशांना कोरोना लसींचा पुरवठा करण्यासाठी अ‍ॅस्ट्रॅजेनेका, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) व भारत सरकारबरोबर तातडीने काम करण्याचा प्रयत्न करीत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com