कोरोनाचं सत्य येणार समोर ; 'डब्ल्यूएचओ'ची टीम वुहानमध्ये पोहोचली

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

कोरोनाचा उगम व प्रादुर्भाव नेमका कसा झाला हे शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वात शास्त्रज्ञांची टीम आज चीनच्या वुहानमध्ये पोहोचली.

वुहान – कोरोनाचा उगम व प्रादुर्भाव नेमका कसा झाला हे शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वात शास्त्रज्ञांची टीम आज चीनच्या वुहानमध्ये पोहोचली. या शास्त्रज्ञांना दोन आठवडे आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. एक वर्षापूर्वी उद्रेक झालेल्या कोरोना विषाणूबद्दलची माहिती चीनने लपवल्याच्या आरोप होत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून पारदर्शक चौकशीची मागणी करण्यात येत होती.

अमेरिकेला मिळणार पहिले कृष्णवर्णीय संरक्षण मंत्री ? 

जागतिक आरोग्य संघटनेकडून या चौकशीसाठी मंजूर करण्यात आलेल्या अटींवर टिका करण्यात आली आहे, ज्याअंतर्गत पहिल्या टप्प्याचं संशोधन चीनच्या संशोधकांकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे या संशाधनाबद्दल शंका उपस्थित होण्याची शक्याता आहे.

काही महिन्यांपासून देशांतर्गत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात चीन अपयशी ठरलं आहे. डब्ल्यूएचओचे सर्वोच्च तज्ज्ञ पीटर बेन एम्बेरेक हे 10 तज्ञांचे नेतृत्व करीत असल्याचे डब्ल्यूएचओच्या प्रवक्त्याने सांगितले. आयसोलेशन संपल्यानंतर हे पथक वुहानमधील संशोधन संस्था, रुग्णालये आणि सीफूड बाजाराच्या लोकांची मुलाखत घेण्यासाठी दोन आठवडे घालवतील.

अमेरिकेच्या माजी राजदूत समांथा पावर आंतरराष्ट्रीय विकास संस्थेचं नेतृत्व करणार

सिंगापूरमधील स्टॉपओव्हर दरम्यान त्यांनी बुधवारी मुलाखतीत रॉयटर्सला सांगितले की, ही टीम प्रामुख्याने वुहानमध्ये थांबेल. गेल्या आठवड्यात, डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रॉस डॅनॉम गेयब्रेयसिस म्हणाले की, हे खूप निराशाजनक आहे की, चीनने बहुप्रतीक्षित मिशनसाठी शास्त्रज्ञांच्या प्रवेशास लवकर मान्यता दिली नाही

संबंधित बातम्या