डब्ल्यूएचओच्या पथका कडून हुबेईतील सी फूड मार्केटला भेट; इथूनच झाला होता कोरोनाचा विस्फोट   

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 31 जानेवारी 2021

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) टीमने आज चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी असलेल्या वुहानमधील बाजाराला भेट दिली. या बाजारातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वात अगोदर झाल्याचे समजण्यात येते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) टीमने आज चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी असलेल्या वुहानमधील बाजाराला भेट दिली. या बाजारातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वात अगोदर झाल्याचे समजण्यात येते. कोरोना विषाणूचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करीत डब्ल्यूएचओच्या तज्ञांच्या पथकाने चीनमधील वुहान सी फूड मार्केटला भेट दिली. एक वर्षांपूर्वी वुहानच्या याच बाजारात कोरोनाच्या विषाणूच्या उद्रेकाचा संसर्ग आढळला होता.

डब्ल्यूएचओच्या सदस्यांनी हुनान सीफूड मार्केटला भेट दिली. मागील वर्षाच्या जानेवारी महिन्यात या फूड मार्केटला सील करण्यात आले होते. डब्ल्यूएचओच्या चार सदस्यांशिवाय अन्य कोणलाही या बाजारात जाण्याची परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती मिळाली आहे. तर डब्ल्यूएचओच्या पथकाला चीन मध्ये पोहचल्यानंतर 14 दिवसांसाठी क्वारंटाईन व्हावे लागले होते. त्यानंतर हे सदस्य कोरोनाच्या विषाणूचा अभ्यास आणि शोध घेण्यासाठी बाहेर पडले आहेत. 

'इस्राईल'ची जगातील सर्वात शक्तीशाली गुप्तहेर संस्था करणार दिल्ली...

सध्यातरी, डब्ल्यूएचओ आणि हे पथक कोरोना विषाणूच्या तपासाच्या सुरूवातीच्या टप्प्यावर असून, फूड मार्केटला भेट दिल्यानंतर डब्ल्यूएचओच्या सदस्य तज्ज्ञांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. तर, कोरोनाच्या या विषाणूमुळे जगभरात 2 दशलक्षाहून अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणि सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठी हानी यामुळे पोहचली आहे. 

दरम्यान, चीनच्या सरकारी मालकीच्या ग्लोबल टाईम्सने गेल्या आठवड्यात एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात, वुहानमधील हुनान सीफूड मार्केटला कोरोना विषाणूचे केंद्र समजणे चुकीचे असल्याचे म्हटले होते.       

संबंधित बातम्या