'पंतप्रधान मोदींचे WHO ने मानले आभार'

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

कोरोना महामारीवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली पावले उचलली जात आहेत.

भारताने कोरोना लसीकरणाला सुरुवात केल्यानंतर लस वितरण मोहिमेअंतर्गत 60 पेक्षा अधिक देशांमध्ये लस पोहचवण्याचे निश्चित केले. भारताने पाकिस्तानसोडून शेजारी असणाऱ्या नेपाळ, बांग्लादेश, भूतान, श्रीलंका या देशांबरोबर पश्चिम आशिया, आफ्रिका, लॅटीन अमेरिकासह पश्चिमेकडील देशांनाही कोरोना लस पाठवली आहे.

कोरोना महामारीवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली पावले उचलली जात आहेत. या अंतर्गत छोट्या आणि गरिब देशांना 'लस मैत्री' कार्यक्रमातंर्गत कोरोनावरील लस मोफत पुरवण्यास सुरुवात झाली. जागतिक आरोग्य संघंटनेचे महासंचालक टेड्रास अधनॉम घेबेरियस यांनी भारताचे अणि पंतप्रधान मोदींचे गरीब अणि छोट्या देशांना मदत करण्यासठी त्याचबरोबर लस समानतेला दिलेल्या प्रोत्सहानाबद्दल आभार मानले आहेत. जगातील इतर देशांनाही भारताचे अनुकरण केले पाहिजे. अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

ड्रॅगनच्या कुरघोडीवर भारताने केलेल्या 'या' चालीमुळेच सीमावाद निवळला 

टेड्रॉस घेबेरियस आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, ''भारताचे आणि पंतप्रधान मोदी यांचे लस समानतेला पाठिंबा दिल्याबद्दल आभार. तुमच्या कोव्हॅक्स आणि कोविड 19 वरील लस लोकांपर्यंत पोहचवण्याच्या वचनबद्दतेमुळे 60 पेक्षा अधिक देशातील नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना लसी देण्यात मदत होत आहे',' मला आशा आहे की इतर देशही अनुसरण करतील. भारताने आत्तापर्यंत विविध देशात कोरोना लसीचे 361 लाखांहून अधिक डोस पाठवल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्त म्हणाले, इतर देशांना लसींचा पुरवठा येत्या आठवड्यात टप्प्याटप्प्याने सुरु राहणार आहे. मात्र लसीकरण कार्यक्रमांतर्गत देशातील गरजा लक्षात घेणे तेवढेच महत्त्वाचे असणार आहे. 

 

संबंधित बातम्या