कोण होता खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर? जो ठरतोय भारत-कॅनडामधील तणावाचे कारण

Hardeep Singh Nijjar याने कॅनडामध्ये, प्लंबर म्हणून काम सुरू केले, पण, गेल्या काही वर्षांत, खलिस्तान समर्थक कारवायांमध्ये त्याच्या सहभागामुळे त्याच्या संपत्तीत अचानक वाढ झाली.
India Canada Relations|Justin Trudeau|Hardeep Singh Nijjar
India Canada Relations|Justin Trudeau|Hardeep Singh NijjarDainik Gomantak

Who was Khalistani terrorist Hardeep Singh Nijjar? The cause of tension between India and Canada:

खलिस्तान समर्थक दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येचा तपास सुरू असताना कॅनडाने सोमवारी एका सर्वोच्च भारतीय राजनयिकाची हकालपट्टी केली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येसाठी भारत सरकारला जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला आहे.

१८ जून रोजी ब्रिटिश कोलंबियातील सरे येथील शीख सांस्कृतिक केंद्राबाहेर हरदीपसिंग निज्जर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ट्रूडो यांनी कॅनडाच्या संसदेत म्हटले आहे की, "कॅनडाच्या भूमीवर कॅनेडियन नागरिकाच्या हत्येमध्ये कोणत्याही परदेशी सरकारचा सहभाग हे आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे."

भारताने आरोप फेटाळले

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येबाबत कॅनडाचे आरोप भारत सरकारने फेटाळून लावले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने 19 सप्टेंबर रोजी सकाळी एक निवेदन जारी करत याबाबत स्पष्टीकरण दिले.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचे आरोप फेटाळले आहेत ज्यात त्यांनी दावा केला होता की 'हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमागे भारत सरकार असू शकते.' या दाव्यानंतर कॅनडाने भारतीय उच्च राजनैतिक अधिकारी पवन कुमार राय यांचीही हकालपट्टी केली आहे.

असे बिनबुडाचे आरोप म्हणजे खलिस्तानी आणि कॅनडात आश्रय घेत असलेल्या अतिरेक्यांवरील लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे. तेथील सरकार त्या दहशतवाद्यांना संरक्षण देत आहे आणि हे दहशतवादी भारताच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला धोका आहेत. या दहशतवाद्यांच्या बाबतीत कॅनडाच्या सरकारची निष्क्रियता दीर्घकाळ चिंतेचा विषय आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालय

कोण होता हरदीप सिंग निज्जर?

  • बंदी घातलेल्या भारतीय फुटीरतावादी गट शीख फॉर जस्टिस (SFJ) शी संबंधित निज्जर याने गुरपतवंत सिंग पन्नू याच्यानंतर संघटनेचा पदभार स्वीकारला होता.

  • पंजाब पोलिसांच्या कागदपत्रांनुसार, तो जालंधरमधील भारसिंग पुरा गावचा रहिवासी होता आणि 1996 मध्ये तो कॅनडामध्ये स्थलांतरित झाला होता.

  • कॅनडामध्ये, त्याने प्लंबर म्हणून काम करण्यास सुरुवात केली, पण, गेल्या काही वर्षांत, खलिस्तान समर्थक कारवायांमध्ये त्याच्या सहभागामुळे त्याच्या संपत्तीत अचानक वाढ झाली.

India Canada Relations|Justin Trudeau|Hardeep Singh Nijjar
Viral Video: 'भ्रष्टाचारी' म्हटल्याने पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानाचा ड्रायव्हर महिलेवर थुंकला
  • निज्जरचा दहशतवादात सहभाग जगतार सिंग तारा याच्या नेतृत्वाखालील बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या सदस्यत्वापासून सुरू झाला. त्यानंतर त्याने खलिस्तान टायगर फोर्स (KTF) हा स्वतःचा गट स्थापन केला. त्याच्यावर भारतातील खलिस्तानी सेलची ओळख पटवणे, प्रशिक्षण देणे आणि निधी पुरवण्याचे आरोप आहेत आणि त्याच्यावर 10 हून अधिक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

  • 2014 मध्ये निज्जरने आध्यात्मिक नेते बाबा भनियारा यांच्या हत्येचा कट रचला होता. 2015 मध्ये, मनदीपसिंग धालीवाल यांना सूचना देण्यासाठी त्याने कॅनडामध्ये प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते, ज्यांना नंतर मिशनसह पंजाबला पाठवण्यात आले होते. मनदीपला जून २०१६ मध्ये अटक करण्यात आली होती.

India Canada Relations|Justin Trudeau|Hardeep Singh Nijjar
Anju Nasrullah Love Story: 3 महिन्यात उतरली प्रेमाची नशा, मुलांची आठवण आल्याने अंजू पाकिस्तानातून परतणार
  • नोव्हेंबर 2020 मध्ये, निज्जरने परदेशात राहणारा सहकारी गँगस्टर अर्श डल्ला याच्याशी युती केली. या व्यतिरिक्त, तो डेरा सच्चा सौदाचे अनुयायी मनोहर लाल यांच्या हत्येमध्ये सहभागी होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com