दारू पिल्यानंतर लोक इंग्रजी का बोलतात?

दैनिक गोमंतक
गुरुवार, 8 एप्रिल 2021

एरवी इंग्रजी बोलताना अडखळत बोलणारे दारू पिल्यानंतर मात्र अगदी अस्खलित इंग्रजी बोलतात, या विषयवर ब्रिटनमध्ये संशोधन झालं आणि त्या संशोधनातून काही गोष्टी समोर आल्या आहेत.

दारू पिल्यानंतर लोक इंग्रजी का बोलू लागतात ? आता तुम्ही म्हणाल या प्रश्नात काही तथ्य आहे का... आपल्याला या प्रश्नात तथ्य वाटत असेल किंवा नसेल  मात्र ब्रिटनच्या काही संशोधकांना यात तथ्य वाटलं आणि त्यांनी या प्रश्नावर संशोधन केले. होय...एरवी इंग्रजी बोलताना अडखळत बोलणारे दारू पिल्यानंतर मात्र अगदी अस्खलित इंग्रजी बोलतात, या विषयवर ब्रिटनमध्ये संशोधन झालं आणि त्या संशोधनातून काही गोष्टी समोर आल्या आहेत.(Why do people speak English after drinking alcohol?)

मद्यप्राशन केल्या नंतर एखादी व्यक्ती काय करू शकते याचा अंदाज लावणं कठीण आहे. मात्र एक बाब आपल्याही निदर्शनास आली असेल की दारू पिल्यानंतर अनेकदा लोक इंग्रजी बोलू लागतात आणि ते ही न अडखळता. यावर ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल, युनिव्हर्सिटी ऑफ मास्ट्रिच आणि ब्रिटनमधील एका महाविद्यालयाने एकत्र येत या विषयावर संशोधन केले आहे. 

रंजक विषयावर केलेल्या या संशोधनातून काही अतिरंजक बाबी समोर आल्या आहेत. या संशोधनादरम्यान डच भाषा शिकत असणाऱ्या ५० जर्मन लोकांची निवड केली गेली.  या ५० लोकांवर प्रयोग करताना काही लोकांना जास्त प्रमाणात अल्कोहोल देण्यात आले तर काहींना फक्त कोल्डड्रिंक (Colddrink) देण्यात आले होते.  अल्कोहोल (Alcohol) मिसळलेले ड्रिंक प्यायल्यानंतर जर्मन लोकांच्या एका गटाला नेदरलँडमधील लोकांसोबत डच भाषेत बोलण्यास सांगण्यात आले. तेव्हा असे लक्षात आले की ज्या लोकांच्या पेयामध्ये अल्कोहोल मिसळण्यात आले, ते लोक न अडखळता डच बोलू लागले. कारण दारू पिल्यानंतर लिग्विस्टिक प्रोफिसिएन्शी दारुपिल्यानंतर वाढते परिणामी तुमचा आत्मविश्वास वाढतो हे या संशोधनातून समोर आले आहे. 

Summer Health Tips: उन्हाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी जरूर प्या सत्तूचं सरबत

दारू पिल्यानंतर लोक (Drunk People) आपल्याला येत नसलेली भाषा देखील न अडखळत बोलतात, कारण दारू पिल्यानंतर आत्मविश्वास गगनाला भिडलेला असतो, आणि ती भाषा आपल्याला उत्तम येते या अविर्भावात ते ती भाषा (Language)  न अडखळता बोलतात. म्हणूनच कदाचित आपल्याकडे दारू पिल्यानंतर लोक अवघड वाटणारी इंग्रजी (English) सहज बोलू लागतात. असो, दारू पिल्याचे हे फायदे नसून फक्त एक संशोधन (Research) होते. कारण दारू ही आरोग्यासाठी घटक असते, त्यामुळे शारीरिक आणि मानसिक व्याधी जडण्याचा शक्यता असतात. 

संबंधित बातम्या