Hindu Lady Commissioner in Pakistan: पाकिस्तानात 'या' हिंदू महिलेची का होतेय चर्चा? वाचा नेमके प्रकरण...

हसनाबदल शहराच्या सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती
Hindu Lady Commissioner in Pakistan | Sana Ramchand Gulwani
Hindu Lady Commissioner in Pakistan | Sana Ramchand Gulwani Dainik Gomantak

Hindu Lady Commissioner in Pakistan: पाकिस्तानातील सर्वोच्च नागरी सेवा परीक्षा (सीएसएस) उत्तीर्ण होणारी पहिली हिंदू महिला ठरण्याचा मान सना रामचंद गुलवानी (वय 27) यांनी मिळवला आहे. सना यांनी ही परीक्षा उत्तीण केली आहे. त्यानंतर त्यांना पंजाब प्रांतातील हसनाबदल शहराच्या सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Hindu Lady Commissioner in Pakistan | Sana Ramchand Gulwani
Watch Video: 'बघ... माझी आई जळतेय'; योगी सरकारच्या बुलडोझर कारवाईत माय- लेकीचा होरपळून मृत्यू

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार सना सिंध प्रांतातील शिकारपूर शहरात लहानाची मोठी झाली. त्यांनी फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये नावनोंदणी करण्यापूर्वी पालकांच्या इच्छेनुसार डॉक्टर झाल्या.

2020 मध्ये सेंट्रल सुपीरियर सर्व्हिसेस (CSA) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पाकिस्तान प्रशासकीय सेवेत (PSA) सामील होणारी ती पाकिस्तानातील पहिली हिंदू महिला ठरली होती.

पहिल्याच प्रयत्नात तिने परीक्षा उत्तीर्ण केली. तिने 2016 मध्ये शहीद मोहतरमा बेनझीर भुट्टो मेडिकल युनिव्हर्सिटीमधून बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी (MBBS) पदवीसह यूरोलॉजिस्ट म्हणून पदवी प्राप्त केली. यानंतर तिने सीएसएस परीक्षेची तयारी सुरू केली.

Hindu Lady Commissioner in Pakistan | Sana Ramchand Gulwani
Viral Video: जोडप्याचा हनिमूनचा व्हिडीओ व्हायरल, घडलं असं काही की...

परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सना रामचंदने 'वाहे गुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतेह' असे ट्विट केले होते. तिने लिहिले होते की, 'मला हे कळवण्यास आनंद होत आहे की, मी CSS 2020 ची परीक्षा उत्तीर्ण झालो आहे आणि माझी PAS साठी निवड झाली आहे.

याचे संपूर्ण श्रेय माझ्या पालकांना जाते. मी पहिली आहे की नाही हे मला माहीत नाही, पण माझ्या समाजातील कोणीही (महिला) परीक्षा दिलेली मी पाहिलेली नाही.'

पाकिस्तानमध्ये हिंदू हा सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय आहे. अधिकृत अंदाजानुसार पाकिस्तानात 75 लाख हिंदू राहतात. पाकिस्तानातील बहुतांश हिंदू लोकसंख्या सिंध प्रांतात राहते.

एकीकडे पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर अत्याचाराची प्रकरणे सातत्याने समोर येत असताना पाकिस्तानातील हिंदू समुदायासाठी सना गुलवानीचे हे यश मोठे आहे. पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील मुलींचे अपहरण, धर्मांतरण अशा बातम्या वारंवार येत असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com