अमेरिकेत पॉपकॉर्न तर जर्मनीत बिअरसाठी लोक त्रस्त

गेल्या काही वर्षांत महागाई गगनाला भिडली आहे.
अमेरिकेत पॉपकॉर्न तर जर्मनीत बिअरसाठी लोक  त्रस्त
PopcornDainik Gomantak

Why Shortage Of Popcorn: गेल्या काही वर्षांत महागाई गगनाला भिडली आहे. जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने भारतातही महागाईचा भडका उडाला आहे. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अशा काही गोष्टी आहेत ज्या वेगवेगळ्या देशांमध्ये महाग होत आहेत. जसे की, अमेरिकेत पॉपकॉर्न (Why shortage of popcorn) ते स्पायसी सॉसचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्याच वेळी, जर्मन बाजारपेठेत बिअरचा तुटवडा जाणवू लागला आहे. एवढंच नाही तर जपानमधील कांद्याचे भाव लोकांना रडवणारे आहेत. जाणून घेऊया या मागचे कारण...

पुरवठा साखळीवर प्रचंड ताण

वास्तविक, जगभरातील पुरवठा साखळी प्रचंड ताण आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, जगातील पुरवठा साखळीवर खूप ताण आहे, जर एखाद्या उत्पादनाचा कच्चा माल उपलब्ध नसेल, तर पॅकिंगमध्ये अडचण येते. अनेक कंपन्यांनी हे मान्य केले आहे की, पुरवठा साखळीतील समस्या ही जगभरातील कमतरतांचे कारण आहे.

Popcorn
अमेरिका गोळीबार आणि नरसंहार रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलणार

जर्मनीमध्ये बिअरच्या किमती वाढल्या आहेत

अलीकडच्या काही महिन्यांत जर्मनीमध्ये (Germany) बिअरचे दर लक्षणीय वाढले आहेत. दर वाढल्याने बाजारात बिअर तुटवडा जाणवत आहे. यासोबतच ऑस्ट्रेलियातील (Australia) लेट्यूस, जपानमध्ये कांद्यांचीही स्थिती तशीच आहे. त्यामागचे कारण म्हणजे जागतिक पुरवठा साखळीतील अडथळे.

बिअर नाही

बिअरच्या तुटवड्याचे खरे कारण बिअरची कमतरता नसून अॅल्युमिनियमचे कॅन बनवणाऱ्या कंपन्यांनी उत्पादन थांबवले आहे. यासोबतच शिपिंग कंटेनर्सही कमी आहेत. या सगळ्यामागे तज्ज्ञ कोरोना महामारीमुळे (Corona Epidemic) लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम सांगत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com