आज वर्ल्ड रेड क्रॉस डे; जाणून घ्या का साजरा केला जातो हा दिवस...

Why World Red Cross Day is celebrated.
Why World Red Cross Day is celebrated.

प्रत्येक वर्षी 8 मे रोजी आंतरराष्ट्रीय (International) रेडक्रॉस (Recross) दिवस साजरा केला जातो. 1863 पासून आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस आणि रेड क्रिसेंट  चळवळीच्या तत्त्वांना साजरा करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. रेड क्रॉस स्वयंसेवकांच्या गरजू लोकांना मदत करण्याच्या योगदानाबद्दल या दिवशी लोक त्यांना श्रद्धांजली वाहतात. या समितीचे संस्थापक हेनरी डुनेंट हे होते. त्यांची 8 मे रोजी जयंती असते. त्यामुळेच हा दिवस रेड क्रॉस दिवस साजरा करण्यासाठी निवडण्यात आला. हेनरी डुनेंट (Hendry Dunant) यांना नोबेल शांतता पुरस्कार देखील प्राप्त आहे. (Why World Red Cross Day is celebrated )

मुळात कोणत्याही वेळी, कोणत्याही परिस्थितीत सर्व प्रकारच्या मानवी कार्यास उत्तेजन देणे, आरंभ करणे आणि प्रोत्साहित करणे हेच रेडक्रॉस सोसायटीचे मुख्य उद्दीष्ट  आहे.  रेडक्रॉस सोसायटीद्वारे आयोजित कार्यक्रमांचे चार भागांमध्ये विस्तृतपणे वर्गीकृत केले जाऊ शकते. ज्यामध्ये मानवी तत्त्वे आणि मूल्यांचा प्रसार यासह आपत्ती प्रतिसाद, आपत्ती तयारी, आरोग्य आणि काळजी यांचा समावेश आहे.

युद्धाच्या वेळी जखमी सैनिकांना मदत करणे आणि त्यांचे उपचार करणे ही त्याची मुख्य उद्दीष्टे आहेत, तर ही संस्था रक्तपेढीपासून सुरू असलेल्या विविध आरोग्य आणि सामाजिक सेवांमध्ये आपली भूमिका बजावत आहे. पांढर्‍या पट्ट्यावरील रेड क्रॉस चिन्ह या संस्थेची खूण आहे, ज्यामध्ये चुकीच्या वापरासाठी दंड लावण्याची तरतूद आहे आणि दोषी व्यक्तीची मालमत्ता जप्त देखील केली जाऊ शकते.

या व्यतिरिक्त मुख्य म्हणजे रेडक्रॉस सोसायटी ही मानवतेच्या सात तत्वांवर आधारित आहे. मानवता, निष्पक्षपणा, तटस्थता, स्वातंत्र्य, ऐच्छिक, ऐक्य आणि सार्वभौमत्व या सात तत्वांचा त्यात समावेश आहे. 2020 मध्ये कोरोना काळात हा दिवस साजरा करण्यासाठी थीम ठेवण्यात आली होती. स्वयंसेवक, कर्मचारी आणि कोविड -19 सोबत लढणाऱ्या प्रत्येकासाठी #Keepclapping ही ती थीम होती. 
सोबतच त्यांनी  व्हिडिओ क्लिप देखील सामायिक केली होती, ज्यात कॉव्हिड -19 च्या जागतिक साथीच्या लढाईवर काम करणारे कर्मचारी आणि स्वयंसेवक यांच्या प्रयत्नांचे कौतुक जगभरातील लोक पाहू शकत होते.

जगातील सुमारे 210 देश या संस्थेशी संबंधित आहेत. भारतात रेडक्रॉस सोसायटीची स्थापना 1920 मध्ये संसदीय कायद्यानुसार झाली. रेडक्रॉस सोसायटीच्या भारतात 700 हून अधिक शाखा आहेत.  1934 मध्ये झालेल्या 15 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत रेडक्रॉस सोसायटीच्या तत्त्वांना मान्यता देण्यात आली, त्यानंतर ती जगभरात लागू करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com