बांगलादेशची स्थिती श्रीलंकेसारखी होईल का? पेट्रोल अन् डिझेलचे दर भिडले गगनाला, लोक रस्त्यावर उतरले

बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीची झलक श्रीलंकेसारखी पाहायला मिळत आहे, पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींनी लोकांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडले आहे.
Bangladesh
BangladeshDainik Gomantak

बांगलादेशातील (Bangladesh) सध्याच्या परिस्थितीची झलक श्रीलंकेसारखी पाहायला मिळत आहे, पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींनी लोकांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडले आहे. माध्यमांनुसार बांगलादेश सरकारने इंधनाच्या किमती 51.7 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. ऊर्जा आणि खनिज संसाधन मंत्रालयाच्या किमतीच्या सूचनेनुसार, एक लिटर ऑक्टेनची किंमत आता 135 टक्‍के आहे, जी पूर्वीच्या 89 टक्‍के दरापेक्षा 51.7 टक्क्यांपर्यत वाढली आहे. डिझेल आणि रॉकेलचे दरही 42.5 टक्क्यांनी वाढून 114 रुपये प्रतिलिटर करण्यात आले आहेत. ()

Bangladesh
China Corona Outbreak: चीनच्या 'या' शहारात कोरोनाचा उद्रेक, 80 हजार पर्यटक अडकले

याशिवाय, पेट्रोलची किंमत आता 130 रुपये प्रति लिटर आहे, त्यात 44 रुपये आणि 51.1 टक्क्यांनी वाढ केली आहे, असे अधिसूचनेत म्हटले आहे. सरकारी वितरण कंपन्यांवरील अनुदानाचा भार कमी करण्यासाठी किरकोळ स्तरावरील किमतींमध्ये नवीनतम वाढ करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाच्या किमती बांगलादेशच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणात आहेत. तज्ञ्ज्ञांनी सांगितले की, इंधनाच्या दरात वाढ झाल्याने महागाई आणखी वाढेल, जी जूनमध्ये 7.56 टक्क्यांवर पोहोचली, जो जवळपास नऊ वर्षांतील सर्वोच्च दर आहे.

बांगलादेशची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये गणली जाते, परंतु रुसो-युक्रेन युद्धामुळे वाढत्या ऊर्जा आणि अन्नधान्याच्या किमती यामुळे तो खंडित झाला. बांग्लादेशचे निर्यात बिल आणि चालू खात्यातील तूट देखील वाढली आहे.

Bangladesh
America Ohio Shooting: अमेरिकेत पुन्हा गोळीबार, 4 जणांचा मृत्यू, आरोपी फरार

पेट्रोल-डिझेल आणि खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे जनता रस्त्यावर उतरली आहे, ठिकठिकाणी निदर्शने देखील होत आहेत. अलीकडे श्रीलंकेची अर्थव्यवस्था ज्या प्रकारे रुळावरून घसरली आहे, तशी परिस्थिती उद्भवू नये, ही जनतेची गरज देखील आहे. दरम्यान, बांग्लादेश सरकारचे म्हणणे आहे की ते लवकरच परिस्थितीवर नियंत्रण ठेवतील. बांग्लादेशातील इंधन व्यापाऱ्यांनी भाडे आणि कमिशनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी संप पुकारला असताना, बांग्लादेश टँकर मालक संघटना आणि इंधन तेल पंप मालक संघटनेने या संपात भाग घेतला, यामुळे 15 जिल्ह्यांमध्ये इंधन पुरवठा देखील ठप्प झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com