'द रॉक' अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणार? 46 टक्के अमेरिकी नागरिकांचा पाठिंबा

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 12 एप्रिल 2021

हॉलीवूड अभिनेता ड्वेन जॉन्सन (Dwayne Johnson) म्हणाला की, जर तो कधी अमेरिकेचा अध्यक्ष (US President)  झाला तर देशातील जनतेची सेवा करणे हे त्याच्यासाठी सन्मानाची बाब ठरेल.

वॉशिंग्टन: हॉलीवूड अभिनेता ड्वेन जॉन्सन (Dwayne Johnson) म्हणाला की, जर तो कधी अमेरिकेचा अध्यक्ष  (US President)  झाला तर देशातील जनतेची सेवा करणे हे त्याच्यासाठी सन्मानाची बाब ठरेल. जॉन्सनच हे वक्तव्य एका सर्व्हेला उत्तर देताना समोर आलं आहे. ज्यात म्हटलं आहे की, अमेरिकेच्या (America) जवळपास निम्म्या लोकसंख्येला असं वाटत की त्याने अध्यक्षीय निवडणुकीसाठी अर्द सादर करावा.

डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) चा कुस्तीपटू ते अभिनेता असा प्रवास जॉन्सनने केला आहे. जॉन्सनने  इंस्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये एक लेख शेअर केला आहे, त्यामध्ये असे नमूद केले आहे की किमान 46 टक्के अमेरिकन लोक ड्वेन 'द रॉक' जॉनसनच्या वतीने राष्ट्रपती पदाच्या अर्जाला पाठिंबा देतील. जॉन्सनला 'द रॉक' या नावानेही ओळखले जाते.

संस्थापकांनी विचार केला असेलच...

"खूप आनंददायक, मला असे वाटत नाही की, आमच्या संस्थापक सदस्यांनी असा विचार केला असेल की एखाद्याने सहा फूट चार इंच हाइट असलेला, टक्कल, टॅटू वाला, अर्धा काळा, पिणारा,कृष्णवर्णीय, फॅनी बॅग घातलेला एक व्यक्ती त्यांच्या क्लबमध्ये सहभागी होईल, परंतु जर असे खरच कधी झाले तर लोकांची सेवा करणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब असणार आहे.

आधी पण व्यक्त केली होती  इच्छा

खरं तर, जॉन्सनचे वडील कृष्णवर्णीय होते आणि आई सामोओची रहिवासी आहे. तसच, तो फॅनी म्हणजेच कंबरेला बांधलेली बॅग परिधान करण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध आहे. अभिनेत्याने राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करण्याची ही पहिली वेळ नाही. अध्यक्षपदासाठीच्या अर्जाचा त्याने गांभीर्याने विचार केला आहे, असे जॉन्सनने 2017 मध्ये म्हटले होते.

अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी मागील वर्षी 3 नोव्हेंबर रोजी निवडणुका घेण्यात आल्या ज्यामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन विजयी झाले. त्याच वेळी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जनतेने नाकारले. मात्र ट्रम्प यांनी हार मानण्यास नकार दिला होता आणि अनेक ठिकाणी निवडणूक निकालांना आव्हान दिले होते. 6 जानेवारी रोजी ट्रम्प समर्थकांनी अमेरिकन संसदेवर हल्ला केला आणि दंगलीत पाच लोकांचा मृत्यू झाला, ज्यासाठी माजी राष्ट्रपतींना दुसऱ्यांदा महाभियोगाचा सामना करावा लागला होता. सर्व चढउतारानंतर बायडन यांनी 20 जानेवारी रोजी अमेरिकेच्या 46 व्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by therock (@therock)

संबंधित बातम्या