Viral News: नवऱ्याला लागली एक कोटीची लॉटरी, बायको प्रियकरासोबत गेली पळून

Thailand News: दक्षिण आशियाई देश थायलंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Couple
CoupleDainik Gomantak

Trending News: दक्षिण आशियाई देश थायलंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एक महिला तिच्या प्रियकरासोबत पतीकडून सुमारे एक कोटी रुपये घेऊन पळून गेली. पतीने लॉटरीत एक कोटी रुपये जिंकले होते. पत्नी आणि पैसे दोघेही गेल्याने पती खूप अस्वस्थ आहे. एक कोटी रुपये घेऊन पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याची बातमी समजताच त्याला धक्काच बसला. या घटनेनंतर तो खूप अस्वस्थ आहे. घटनेनंतर त्याने पोलिस ठाणे गाठून पोलिसांकडे न्यायाची याचना केली.

पतीचे 1 कोटी रुपये घेऊन पत्नी पळून गेली

द थायगरमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, महिला (Women) तिच्या प्रियकरासोबत पतीकडून सुमारे एक कोटी रुपये घेऊन पळून गेली. ही घटना थायलंडच्या (Thailand) इसान प्रांतात घडली आहे. पीडित पतीचे नाव मानित असे आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्याने 60 लाख Baht म्हणजेच सुमारे 1 कोटी 36 लाख रुपये जिंकले होते. त्याची 45 वर्षीय पत्नी Angkanarat आपल्या प्रियकरासोबत 1 कोटी रुपये घेऊन पळून गेली आहे. याबद्दल तो खूप नाराज आहे.

Couple
Viral Video: रस्त्यात बसून मुलाने दाखवले असे टॅलेंट, पाहण्यासाठी जमली गर्दी; पाहा Video

पत्नीच्या विश्वासघाताने पती निराश

विशेष म्हणजे, मानितने एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. कुटुंबातील लोक विचार करत होते की, आता आपली गरिबी दूर होईल. आता त्यांना लक्झरी लाइफ जगता येणार आहे. मात्र पत्नी आपला विश्वासघात करुन प्रियकरासोबत पैसे घेऊन पळून जाईल हे मानितला माहीत नव्हते.

Couple
Viral Video: अरे देवा! चक्क कोब्रा सापाला घातली शॅम्पूने आंघोळ...

फरार महिला 3 मुलांची आई

मनितचा विवाह 26 वर्षांपूर्वी Angkanarat सोबत झाला होता. दोघांना 3 मुले आहेत. मानितला कल्पना नव्हती की, त्याची पत्नी कोणाबरोबर पळून जाईल. इतकेच नाही तर ती लॉटरीचे पैसे देखील चोरेल. या घटनेनंतर मनितने तातडीने पोलीस (Police) स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रार नोंदवण्यात आली आहे. आम्ही प्रकरणाचा तपास करत आहोत. महिला आणि तिच्या प्रियकराचा शोध सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com