Brazil: लग्नाच्या पहिल्याच रात्री महिलेचा हार्ट अटॅकने मृत्यू ; मुलीचे वय होते 18 तर मुलाचे...

Brazil: लग्नाच्या पहिल्याच रात्री महिलेचा हार्ट अटॅकने मृत्यू ; मुलीचे वय होते 18 तर मुलाचे...
physical relationship

ब्राझीलमधील इबीराइट (Ibirite City) सिटीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे जिथे एका 18 वर्षाच्या महिलेचा (Woman died) तिच्या लग्नाच्या (marriage) पहिल्या रात्री लैंगिक संबंधा दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाला. पोलिसांनी असा दावा केला आहे की वधूच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची हिंसाचाराची चिन्हे नाहीत त्यामुळे या दु:खद घटनेला पोलिसांनी अपघाती मृत्यू असल्याचे म्हटले आहे.

लग्नाच्या पहिल्या रात्री लैंगिक संबंध ठेवताना एका 18 वर्षीय महिलेला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर रुग्णालयात नेत असतानाच तिचा वाटेत मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितले की, 18 वर्षीय महिलेचे 29 वर्षीय व्यक्तीशी लग्न झाले होते आणि रात्री अचानक तिला अस्वस्थ वाटले. यानंतर ती जमिनीवर पडली. महिलेच्या नवऱ्याने त्याच्या शेजार्‍याला बोलावले आणि रुग्णालयात जाण्यासाठी टॅक्सी आणायला सांगितले. 

माहितीनुसार प्रथम एका टॅक्सी चालकाने त्या महिलेस रुग्णालयात नेण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांचा दुसरी टॅक्सी आणेपर्यंत वेळ गेला. नंतर दुसरी आणखी एक टॅक्सी मागविली गेली आणि त्याही टॅक्सी ड्रायव्हरने मदत करण्यास नकार दिला. शेवटी  आपत्कालीन सेवा सेंटरला कॉल करण्यात आला. मृत महिलेच्या पतीने सांगितले की, ही पण रुग्णवाहिका येण्यास सुमारे एक तास लागला आणि या दरम्यानच पत्नीचा मृत्यू झाला. त्याच वेळी, आपत्कालीन सेवांनी सांगितले की पहिली रुग्णवाहिका कॅन्सल झाली होती म्हणून दुसरी रुग्णवाहिका 21 मिनिटांत आली. मिळालेल्या माहितीनुसार, पॅरामेडिक्स जेव्हा या कपलच्या घरी पोहोचले तेव्हा ती महिला श्वास घेत होती, परंतु रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला.

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असे आढळले की त्या महिलेला ब्राँकायटिसचा(Bronchitis) त्रास होता, जो श्वासनलिकाचा गंभीर रोग आहे. श्वासनलिका पासून फुफ्फुसांपर्यंत(Trachea) वाहून नेणाऱ्या नलिकांना ब्रॉन्ची(Bronchi) म्हणतात. या रोगात, ब्रोन्चीच्या आतील भाग संसर्ग आणि इनफेक्शनमुळे कमकुवत होत जातो, ज्यामुळे त्यांचा आकार बलूनसारखा बनतो. या इंफेक्शनमुळे, नलिकेच्या आतील भागावर मोठी सुज येते.

पोलिसांनी सांगितले की वधूच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराच्या खुणा नव्हत्या त्यामुळे तिचा अपघाती मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. शेजारच्या व्यक्तीनेही त्याला महिलेचा मृत्यूपूर्वी किंचाळण्याचा किंवा कुठलाही आक्रोश करणारा आवाज ऐकायला आला नसल्याचे सांगितले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com