नासाच्या प्रमुखपदी आता भारतीय वंशाची महिला

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

अमेरिकेचे  नवनिर्वाचित  अध्यक्ष  जो  बायडन  यांनी  अनेक  भारतीय  वंशाच्या व्यक्तींना  प्रशासनात  महत्त्वाची  पदे  दिली  आहेत.

वाशिंग्टन: अमेरिकेचे  नवनिर्वाचित  अध्यक्ष  जो  बायडन  यांनी  अनेक  भारतीय  वंशाच्या व्यक्तींना  प्रशासनात  महत्त्वाची  पदे  दिली  आहेत. आता  अमेरिकेतील  स्पेस  एजन्सी असणाऱ्या  नासाची  जबाबदारी  भारतीय़  वंशाच्या  भव्या  लाल  यांच्या  हाती  दिली  आहे. नासाच्या  कार्यकारी  प्रमुख  पदी  निवड  करण्यात  आली आहे. अमेरिकेचे  नवनिर्वाचीत अध्यक्ष  जो  बायडन  यांनी  भव्या  लाल  यांच्या  नियुक्तीला  एक  पत्रककाडून त्यांच्या नावाला  मंजूरी  दिली आहे.

म्यानमारमध्ये लष्करांनी सत्ता हाती घेतल्यानंतर अमेरिकेने दिला इशारा

भव्या  यांना  अवकाश  संशोधन  क्षेत्राचा  त्यांना  मोठा  अनुभव  आहे. यापूर्वीही  भव्या  या नासाच्या  नवीन  संकल्पनावर  काम  करणाऱ्या  आणि  अभियांत्रीकी  सल्लागार  समितीच्य़ा सदस्य  होत्या. तसेच  भव्या  यांनी  केंब्रीजमधल्या  मैसाच्युसेट्स  इन्स्टिट्यूट  ऑफ टेक्नोलॉजीच्या  विज्ञान  आणि  तंत्रज्ञान  धोरण  केंद्राचे  संचालक  पदही  भूषवलं  आहे. भव्या  यांनी  अणू  विज्ञान  विषयात  शिक्षण  घेतले  आहे.

तसेच  त्यांनी  सार्वजनिक प्रशासनात  त्यांनी  डॉक्टरेटटचं  शिक्षण  सुध्दा  घेतले आहे. आता  भव्य़ा  यांच्य़ावर अमेरिकेच्या  प्रमुख  असणाऱ्य़ा  स्पेस  एजन्सीची  त्य़ांच्यावर  जबाबदारी  देण्यात  आली आहे. आता  भव्या  नासामधील  वरिष्ठ  आर्थिक  सल्लागार  म्हणून  काम  करणार  आहेत. अमेरिकेने  अंतराळ  मोहिमांच्या  संशोधनासाठी  किती  खर्च  करावा  त्याचबरोबर  आर्थिक सल्ले  देण्याची  जबाबदारीही  त्यांच्य़ावर  असणार  आहे.   

संबंधित बातम्या