महिलांनो सावधान! स्पर्म डोनरच्या शोधात असलेल्या महिलेवर झाला ‘मेडिकल रेप’ 

महिलांनो सावधान! स्पर्म डोनरच्या शोधात असलेल्या महिलेवर झाला ‘मेडिकल रेप’ 
Medical Rape

न्यूयॉर्कच्या(New York) एका महिलेने एका डॉक्टरवर स्पर्म टेस्ट(Sperm) मध्ये हेराफेरी केल्याचा आरोप केला आहे. हा आरोप त्या महिलेने 40 वर्षानंतर केला आहे. या महिलेचा असा दावा आहे की बर्‍याच वर्षांपूर्वी तिने गरोदरपणाच्या(Pregnancy) समस्येसंदर्भात डॉक्टरांची भेट घेतली होती. यादरम्यान, डॉक्टरांनी तिच्या परवानगीशिवाय तिच्या गर्भात शुक्राणू टाकून तिला गर्भवती केले. आता या घटनेला डॉक्टरांच्या भाषेत ‘मेडिकल बलात्कार’  (medical Rape) असे म्हटले जात आहे.(Woman seeking sperm donor gets Medical Rape)

स्पर्म डोनरच्या शोधात होती

बियांका वास असे या महिलेचे नाव आहे. कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये बियांका यांनी सांगितले की, तिने 1983 मध्ये डॉ. मार्टिन ग्रीनबर्ग यांची भेट घेतली होती. त्या स्पर्म डोनरच्या शोधात होती. आणि गर्भवती न होण्याच्या समस्येला तोंड देत होत्या. बियांकाच्या मते, डॉक्टरांनी तिला स्पर्म बाबत कुठलीही विचारणा न करता तिच्या गर्भात स्पर्म सोडले आणि तिला गरोदर बनवले. आता ही महिला  40 वर्षानंतर दावा करीत आहे की डॉक्टरांच्या या कृतीबद्दल तिला माहिती झाली आहे. आणि म्हणून तिने हा आरोप केला आहे.

100 डॉलर रूपये फिस घेतली होती
त्या महिलेने सांगितले की डॉक्टरांनी दुसर्‍या व्यक्तीच्या शुक्राणूंचा उपयोग करण्याबद्दल बोलले होते. यासाठी त्याने तीच्या पासून 100 डॉलर्स ची फीस देखील घेतली होती. डॉक्टरांनी या महिलेला डोनर बाबत कुठलीही प्राशमिक माहिती विचारली नाही, किंवा तीला त्या डोनर बद्दल पुर्व कल्पनाही दिली नाही. बियांकाचे असे म्हणणे आहे की, तीने  नकळत स्पर्म डोनेट करण्याबद्दल बोलली होती. बियांकाचे म्हणणे आहे की, हे स्पर्म डोनर डॉक्टरांच्याच कुणीतरी परिचित व्यक्तीपैकी आहे.

डॉक्टरांवर विश्वास होता
आता प्रश्न असा आहे की, इतक्या वर्षानंतर महिलेला या घटनेची माहिती कशी मिळाली? या महिलेला काही दिवसांपूर्वी तिची मोठी मुलगी रॉबर्टाने डीएनएची टेस्ट केली. रिपोर्टमध्ये त्याच्या वडिलांचे नाव डॉ ग्रीनबर्ग असे लिहिले होते. यानंतर त्या महिलेने न्यायालयात जाऊन ती बेकायदेशीर आणि अस्वीकार्य असल्याचे सांगितले. या सगळ्या प्रकरणामुळे डॉक्टरांवर रुग्णांचा असलेला विश्वास कमी होतो. डीएनए अहवालाच्या आधारे महिलेने असे दावे केले आहेत. बियांकाचे म्हणणे आहे की तिने एका मुलीला जन्म दिला, जीची तिने डीएनए टेस्ट केली नव्हती नाही कारण तिला खात्री होती की डॉक्टर कधीही आपले स्पर्म डोनेट करीत ​​नाहीत.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com