अफगाणिस्तानात सामाजिक कार्यकर्तीची गोळ्या झाडून हत्या

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 डिसेंबर 2020

अफगाणिस्तानमधील कापिसा प्रांतात एका महिला अधिकार कार्यकर्तीची गोळ्या झाडून हत्या केली. फेरिश्‍ता कोहिस्तानी असे या कार्यकर्तीचे नाव असून हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात कोहिस्तानी यांचा भाऊ जखमी झाला आहे.

काबूल : अफगाणिस्तानमधील कापिसा प्रांतात एका महिला अधिकार कार्यकर्तीची गोळ्या झाडून हत्या केली. फेरिश्‍ता कोहिस्तानी असे या कार्यकर्तीचे नाव असून हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात कोहिस्तानी यांचा भाऊ जखमी झाला आहे. अफगाणिस्तानातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात कोहिस्तानी यांनी वारंवार आवाज उठविला होता. यासाठी त्यांनी अनेकवेळा निदर्शने केली होती आणि सोशल मीडियावरुनही जनजागृती केली होती. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारली आहे.

संबंधित बातम्या