
Thailand News: लग्न आणि नात्याच्या गुंतागुंतीची अनेक चित्र-विचित्र प्रकरणे जगभरातून अनेकदा समोर येतात. कधी-कधी अशी घटना समोर येतात की, पती-पत्नीमध्ये तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश होतो. त्यामुळे अनेकवेळा धक्कादायक खुलासेही होतात. परंतु इथे पत्नी स्वतःच पतीसाठी मुलगी शोधत असल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर तिने आपल्या पतीसाठी तीन मुलींची मागणी केली असून तिने एक जाहिरातही काढली आहे.
डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, थायलंडमध्ये (Thailand) राहणाऱ्या या महिलेचे नाव 'पाथिमा' आहे. तिने आपल्या पतीसाठी तीन मुलींच्या जाहिराती दिल्या आहेत. या जाहिरातीत त्यांना कशा प्रकारची मुलगी हवी आहे, हे देखील सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी ही जाहिरात का काढली हे देखील सांगितले आहे. गंमत म्हणजे त्यांना एक मुलगीही आहे.
दुसरीकडे, महिलेचे (Woman) म्हणणे आहे की, ''मी अनेकदा आजारी असते त्यामुळे पतीची काळजी घेऊ शकत नाही. मी माझ्या पतीला ज्याच्याशी वाटेल त्यासोबत राहण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. मी यामध्ये त्यांना मदत करत आहे. मी अशा महिलांच्या शोधात आहे, ज्या पतीला आनंदी ठेवू शकतील आणि त्यांच्या कामातही मदत करु शकतील. त्या बदल्यात मुलींना महिन्याला पैसे दिले जातील.''
रिपोर्टनुसार, या महिलेने तिच्या सोशल मीडिया (Social Media) स्पेसमध्ये ही जाहिरात काढली आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या महिलांची एचआयव्ही चाचणी आवश्यक असल्याचे महिलेने लिहिले आहे. त्या 30-35 वर्षीय असाव्यात. त्याचबरोबर त्यांच्याकडे हायस्कूल किंवा बॅचलर पदवी असावी. महिलांचे राहणे, जेवणही मोफत असेल. सध्या महिलेची ही स्टाईल व्हायरल होत असून लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही देत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.