तालिबानी राजवटीत अफगाणि महिलांवर मर्यादांचा पडदा

शरिया कायद्याचे सर्वात जास्त परिणाम महिलांना भोगावे लागतात कारण शरिया कायद्याअंतर्गत अनेक बंधने महिलांवर लादले गेले.
Afghanistan Women
Afghanistan WomenFile Image

इस्लामिक अमिरात संस्कृतीचे आयुक्त सदस्य एनामुल्ला समनगनी (Enamulla Samangani) यांनी काल 'इस्लामिक अमिरात महीलांवरील अत्याचाराचा निषेध करते.' असे वक्तव्य केले. मात्र तालिबानची (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) सत्ता आल्यापासून महिला आणि मुलांच्या सुरक्षेबद्दल सर्वात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

जिथे जिथे तालिबान्यांनी ताबा मिळवला तिथे समान शरिया कायदा, चाबकाची शिक्षा, रस्त्यावर कत्तल करणे, दाढी वाढवणे, संगीत ऐकणे आणि स्त्रियांवर निर्बंध लादणे असे नियम लागू झाल्याने आता अफगाण पुन्हा मध्ययुगीन फर्मानाच्या युगात परतलाय. या शरिया कायद्याचे सर्वात जास्त परिणाम महिलांना भोगावे लागतात कारण शरिया कायद्याअंतर्गत अनेक बंधने महिलांवर लादले गेले.

Afghanistan Women
Afghanistan WomenFile Image

अफगाणमधील महिलांना होते असे काही स्वातंत्र्य

ज्या अफगाणमध्ये 1972 साली महिलांच स्वांतत्र्य अबाधित होत त्याच अफगाणमध्ये आज महिला असुरक्षित आहेत.

1955 मध्ये हेरात, अफगाणिस्ताण मध्ये महिला बाजारात फिरू शकत होत्या.

Afghanistan Women
Afghanistan WomenFile Image

1965 मध्ये अफगाणातील तरुण स्काउट महिला काबूलमध्ये युवा मेळाव्यादरम्यान परेड करताना दिसत आहे.

Afghanistan Women
Afghanistan WomenFile Image

1967 मध्ये अफगाण महिलांना पाश्चिमात्य कपडे घातलण्याचेही स्वातंत्र्य होते. 1968 मध्ये अफगाण महिलांना सणसमारंभाला पारंपारिक कपडे परिधान करावे की नाही याचेही स्वातंत्र्य होते.

Afghanistan Women
Afghanistan WomenFile Image

तालीबानीयांचा कब्जा अफगाणिस्तानवरून हटल्यानंतर या देशातील तरुण पुरुष आणि महिला काबूल पार्कमध्ये एकत्र फिरायच्या.

Afghanistan Women
Afghanistan WomenFile Image

अफगाणमध्ये महिलांना मिनी स्कर्ट घालण्याच स्वातंत्र्य होत. देशातील तरुणाईला काबुलमध्ये रस्त्यावर चालण्या फिरण्याच स्वातंत्र्य होतं.

Afghanistan Women
Afghanistan WomenFile Image

तालिबानने महिलांसाठी हे नियम लागू केले

  • महिला बुरख्याशिवाय रस्त्यावर जाऊ शकत नाहीत. त्यांच्यासोबत पुरुष नातेवाईकाची उपस्थिती आवश्यक आहे.

  • महिलांना घराच्या बाल्कनीत बाहेर पडण्याची परवानगी नाही.

  • महिलांना रस्त्यांमधून इमारतींच्या आत दिसण्यापासून रोखण्यासाठी, तळमजल्याच्या आणि पहिल्या मजल्याच्या सर्व खिडक्या एकतर रंगवलेल्या किंवा पडद्यांनी झाकलेल्या असाव्यात.

Afghanistan Women
Afghanistan WomenFile Image
  • महिलांना उंच टाचांचे शूज घालण्याची परवानगी नाही. ती मेकअप सुद्धा करू शकत नाही. दोघेही हसणार नाहीत किंवा मोठ्या आवाजात बोलू शकत नाहीत.

  • ते त्यांची छायाचित्रे कोणत्याही चित्रपट, वर्तमानपत्र किंवा मासिकांसाठी देऊ शकत नाहीत.

  • मुलींच्या शाळांमध्ये संगीत आणि क्रीडा उपक्रमांवर संपूर्ण अफगाणिस्तानवर बंदी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com