कोरोनाकाळात महिला पडल्या सर्वाधिक मानसिक समस्यांना बळी: स्टडी

कोरोनाच्या सुरुवातीच्या वर्षात डिप्रेशन आणि एन्जाइटीच्या (Depression Anxiety Cases in Covid) प्रकरणांमध्ये एक चतुर्थांशपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
कोरोनाकाळात महिला पडल्या सर्वाधिक मानसिक समस्यांना बळी: स्टडी
WomenDainik Gomantak

कोरोनाकाळात (Covid 19) जगभरातील लोकांच्या जीवनशैलीमध्ये अमूलाग्र बदल झाला आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासामधून असे समोर आले आहे की, या जीवनशैलीचा सर्वाधिक परिणाम महिलांवर झाला. लॅन्सेट हेल्थ जर्नलमध्ये (Lancet Health Journal) प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, कोरोनाच्या सुरुवातीच्या वर्षात डिप्रेशन आणि एन्जाइटीच्या (Depression Anxiety Cases in Covid) प्रकरणांमध्ये एक चतुर्थांशपेक्षा जास्त वाढ झाली आहे. ही वाढ जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञांसाठी धोक्याची घंटा आहे. परंतु आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील बहुतेक प्रकरणे महिलांशी संबंधित आहेत.

अहवालानुसार, 2020 मध्ये जगभरात 37.4 करोड़ एन्जाइटी डिसॉर्डर असलेल्या लोकांची नोंद झाली आहे. यापैकी सुमारे 7.6 कोटी प्रकरणांमागील कारण म्हणजे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Mental Health of Women in Covid Time) आहे. 7.6 कोटीपैकी सुमारे 5.2 कोटी प्रकरणे महिलांच्या संबंधित आहेत, तर पुरुषांची संख्या केवळ 24 कोटी आहे. हेडवे 2023 मेंटल हेल्थ इंडेक्समध्ये दिसलेल्या आणखी एका अभ्यासात असे दिसून आले आहे की 83 टक्के महिलांनी महामारीच्या काळात मानसिक आरोग्याशी संघर्ष केला आहे.

Women
पोर्तुगालमध्ये जेष्ठ नागरिकांना मिळणार कोरोनाचा बुस्टर डोस

स्त्रियांना काय सहन करावे लागले?

या काळात महिलांना घरगुती हिंसा आणि गर्भपाताचा सामना करावा लागला आहे. मासिक पाळी दरम्यान गर्भवती महिला आणि इतर महिलांनी ने पॅनिक अटैक्स आल्याची तक्रार केली आहे. महिलांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित प्रकरणांमध्ये वाढ होण्यामागील आणखी एक कारण म्हणजे त्यांच्यावर घरकाम आणि मुलांच्या देखभालीचा अतिरिक्त भार. साथीच्या काळात, लॉकडाऊन असल्याने लोकांना घरातून बाहेर पडताच आले नाही. (Women Mental Health). अशा स्थितीत महिलांसाठी कार्यालयीन काम आणि घरगुती कामकाज यामध्ये समतोल साधणे एक कठीण आव्हान बनले. आकडेवारी दर्शवते की, फारच कमी पुरुष स्त्रियांना घरगुती कामात मदत करतात.

Women
आता 'हे' औषध ठरणार कोरोनावर रामबाण उपाय

पर्सनल-प्रोफेश्नल लाइफमध्ये संतुलन

ज्या महिलांची 12 वर्षाखालील मुले आहेत, त्यांच्यामध्ये 44 टक्के लोकांना व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल साधणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम झालेला दिसून आला.

Related Stories

No stories found.