Hijab Row In Iran|...म्हणून इराणमध्ये महिलांनी उतरवला हिजाब

इराण-साघेज येथील महिलांनी 22 वर्षीय महसा अमिनीच्या हत्येच्या निषेधार्थ डोक्यावरून हिजाब (स्कार्फ) काढून टाकला.
Hijab
HijabDainik Gomantak

Hijab War: महसा अमिनी या 22 वर्षीय महिलेचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये खळबळ उडाली आहे. महसाला न्याय मिळवून देण्याची मोहीम आता तीव्र झाली आहे. अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून महसाच्या मृत्यूचा निषेध करत आहेत. आंदोलक महिलांनीही चेहऱ्यावरील हिजाब काढून तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

(Women take off hijab in Iran)

Hijab
Earthquake: दक्षिण-पूर्व तैवानमध्ये पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के

खरं तर, इराणमध्ये महसा अमिनी नावाच्या महिलेला हिजाबच्या नियमांविरुद्ध जाणं इतकं महागात पडलं की तिला पोलीस कोठडीत आपला जीव गमवावा लागला. काही महिन्यांपूर्वी, हिजाब काढल्याबद्दल इराणच्या नैतिक पोलिसांनी महसाला अटक केली होती आणि सतत त्रास दिला होता. पोलीस कोठडीत तिची तब्येत इतकी बिघडली की ती कोमात गेली, त्यानंतर महसाचा मृत्यू झाला. याबाबत इराणमधील महिलांमध्ये संताप आहे.

महसाच्या मृत्यूच्या निषेधार्थ महिला आक्रमक

आपला संताप व्यक्त करत शनिवारी शेकडो लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या आंदोलनात महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये अनेक महिला चेहऱ्यावरून हिजाब काढून निषेध नोंदवत असल्याचे दिसून येते. अमिनी यांच्या होम टाऊन सुक्कजमध्येही लोकांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

आंदोलकांनी दिल्या घोषणा

इराणी पत्रकार आणि कार्यकर्ते मसिह अलीनेजाद यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर निषेधाची छायाचित्रे शेअर केली आहेत. ही छायाचित्रे शेअर करताना तिने लिहिले की, इराण-सागेझच्या महिलांनी 22 वर्षीय महसा अमिनीच्या हत्येच्या निषेधार्थ डोक्यावरील हिजाब काढून टाकला आहे आणि हुकूमशहाला मरण द्या असा नारा दिला आहे. इराणमध्ये हिजाब काढणे हा दंडनीय गुन्हा आहे. आम्ही जगभरातील महिला आणि पुरुषांना एकता दाखवण्याचे आवाहन करतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com