२०२० मधील जगातील सर्वात शक्तिशाली वादळाचा फिलिपिन्सला तडाखा

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

रविवारी फिलिपिन्सच्या पूर्वेकडील भागाला यावर्षी जगातील सर्वात तीव्र असलेले टायफून 'गोनी' ने तडाखा दिला.

फिलिपिन्स : रविवारी फिलिपिन्सच्या पूर्वेकडील भागाला यावर्षी जगातील सर्वात तीव्र असलेले टायफून 'गोनी' ने तडाखा दिला. रविवारी पहाटेपूर्वी सुपर टायफून गोनीने कॅटान्डुआनेस प्रांतावर सर्वप्रथम धडक दिली. आज संध्याकाळी किंवा सोमवारी दुपारपासून टायफून गोनी दक्षिणेकडील लुझोन व मेट्रो मनिला भागात धडकणे अपेक्षित आहे, त्यानंतर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आज दिवसभर आपत्तीजनक वारे आणि वादळाच्या क्षेत्रात तीव्र आणि मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. 'गोनी' टायफूनमुळे फिलिपिन्समध्ये धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. मनिला आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने आपल्या संकेतस्थळावर सांगितले की, गोनी जवळ येत असल्याने मनिलाचे आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व उड्डाणे २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत.

दरवर्षी सरासरी २० चक्रीवादळे आपत्तीग्रस्त फिलिपिन्सला धडकतात. टायफून गोनीमुळे फिलिपिन्सचा कोरोनव्हायरस विरूद्धचा लढा अधिकच गुंतागुंतीचा होईल कारण टायफून गोनीमुळे लाखो लोकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या