जागतिक बँकेने ईएफआयमच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली भारतीयावर

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 10 एप्रिल 2021

जागतिक बँकेने कॉमन डेव्हलपमेंट, फायनान्स अँड इन्स्टिट्यूशन्स (EFI) ग्लोबल प्रॅक्टिस ग्रुपच्या उपाध्यक्षपदाची  भारतीय वंशाचे डॉ. इंद्रमित गिल(Indermit Gill) यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. 

नवी दिल्ली: जागतिक बँकेने कॉमन डेव्हलपमेंट, फायनान्स अँड इन्स्टिट्यूशन्स (EFI) ग्लोबल प्रॅक्टिस ग्रुपच्या उपाध्यक्षपदाची  भारतीय वंशाचे डॉ. इंद्रमित गिल(Indermit Gill) यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. 1 जून 2021 पासून त्याच्याकडे या पदाचा पदभार सोपविण्यात येणार आहे. कर्ज व्यवस्थापन, टिकाव वाढ आणि दारिद्र्य निर्मूलन या विषयांची चांगली जाण असलेले डॉ. गिल यांचे भारत देशाची राजधानी दिल्लीशी विशेष संबंध आहे.(The World Bank Indermit Gill has been appointed as the Vice President of EFIM)

त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून 1978-1981 साली अर्थशास्त्राची पदवी प्राप्त केली आहे. बॅचलर्सनंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून एमएची पदवी पूर्ण केली आहे. 1985 मध्ये त्यांनी ही पदवी प्राप्त केली होती. यानंतर ते पीएचडी पूर्ण करण्यासाठी शिकागो विद्यापीठात गेले. नंतर पुढचे शिक्षण त्यांनी परदेशातून पूर्ण केले.

‘’हीच आहे इम्रान खानची लायकी!’’ 

डॉ.गिल यांनी ‘मिडिल इनकम ट्रैप’ चे तत्व खूप चांगले समजावून सांगितले होते. सुरुवातीच्या काळातच याबद्दल बोलणाऱ्या मोजक्या लोकांपैकी ते एक आहे.  डॉ. गिल सध्या ड्यूक विद्यापीठात प्रैक्टिस ऑफ पब्लिक रिसर्च स्कॉलर आहेत. वर्ल्ड बँकेत त्याचा जुना संबंध आहे. यापूर्वी ते युरोप आणि मध्य आशियातील मुख्य अर्थतज्ज्ञ आणि आर्थिक भूगोलावरील 2009 च्या जागतिक विकास अहवालाचे कर्मचारी संचालक होते.

संबंधित बातम्या