World Environment Day : जैवविविधतेच्या ऱ्हासामुळेच कोरोनाचा त्रास

World Environment Day : जैवविविधतेच्या ऱ्हासामुळेच कोरोनाचा त्रास
World Environment Day

संपूर्ण जग सध्या कोरोना (Corona) महामारीचा सामना करत आहे. जगभर पसरलेल्या कोरोना महामारीचा इकोसिस्टमवर (Ecosystem) देखील मोठा परिणाम झाला आहे. कोरोना विषाणू वाढण्याचे आणि पसरण्याचे मुख्यकारण जैवविविधता (Biodiversity) आणि पर्यावरणाचा ऱ्हास हेच आहे. जंगल तोड झाल्याने प्राणी आणि निसर्गातील जीवजंतू यांच्या राहण्याच्या जागा नष्ट झाल्या, यामुळे कोरोना सारख्या विषाणूची वाढ होऊन त्याचा फैलाव होण्याचे मदत झाली. 

कोरोनाच्या संकटाने जगाला नैसर्गिक पर्यावरण आणि बदलत्या जैवविविधतेशी असलेल्या आपल्या संबंधांचा पुन्हा विचार करण्यास भाग पाडले आहे. मानवता आणि जैवविविधता परस्परावलंबून आहेत. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. निसर्गच आपल्याला साथीच्या रोगापासून वाचवू शकतो. प्राण्यातील काही रोग हे माणसाच्या शरीरात जाऊ शकतात. निसर्गाची हनी केल्याने,  प्राण्यांच्या अनेक जाती आपल्यातून नष्ट होत आहेत. आपल्याला जागतिक आरोग्य सुदृढ ठेवायचे असेल तर आपल्याला जैवविविधता आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. 

युनायटेड नॅशनल असेंब्लीने 1972 मध्ये 5 जून हा जागतीक पर्यावरण दिन (World Environment Day) म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला युनाटेड स्टेटने 'एकच पृथ्वी' असा नारा दिला आहे. यंदा 2021 मध्ये जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने 'इकोसिस्टमच्या सुधारणा' याकडे लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.  या  दिवसाचे जागतिक प्रतिनिधी म्हणून पाकिस्तान काम करेल असे सांगण्यात आले आहे. मागील वर्षी 2020 मध्ये 'जैवविविधता' ही थीम होती. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इकोसिस्टमच्या सुधारणेसाठी 2021 ते 2030 या कालावधीत एक जागतिक अभियान सुरू होईल. यामध्ये जैवविविधतेची होणारी हनी थांबविण्यासाठी इकोसिस्टमच्या सुधारणेकडे लक्ष देण्यात येईल. हवामानात होणारे बदल आणि त्यातून होणारे नुकसान यामुळे जैवविविधता कोलमडून पडत आहे, ती वाचविण्याचे काम इकोसिस्टमच्या आधारे करण्यात येणार आहे. जैवविविधता आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com